(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपचा संवाद मेळावा.दादरच्या योगी सभागृहात संवाद मेळाव्याचं आयोजन, फडणवीस, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बावनकुळे, शेलार उपस्थित.
निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका, यंदा महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ, अमित शाहांनी संवाद मेळाव्यात व्यक्त केला विश्वास. मात्र २०२९ मध्ये एकट्या भाजपाच्या जीवावर सरकार करायचं असल्याचंही केलं विधान.
कुणीही व्हिडीओ, ऑडिओ रेकॉर्ड करू नये अमित शाहांचा भाषणापूर्वी कार्यकर्त्यांना दम. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल. निराशेला गाडून कामाला लागा मी शब्द देतो, महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार तयार करेन. अमित शाहांचं वक्तव्य.
विरोधक कुठलीही तडजोड करायला तयार, मराठी, हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत, फडणवीसांची उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका, आपलंच सरकार येईल मात्र अती आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका. फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
बुथ आणि पन्ना प्रमुख यांचे संघटनांमधील स्थान महत्वाचे, निवडणूकीत जास्त लक्ष ठेवून काम करा, संघटनात्मक कामं सगळ्यांची जबाबदारी. संवाद मेळाव्यात आशिष शेलारांचं कार्यकर्त्यांना आवाहन.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 150 जागांवर तयारी, 150 मतदारसंघांमधील उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या निरीक्षक पाठवले जाणार.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा पाऊस, एका दिवसात १७१ शासन निर्णय जाहीर, सप्टेंबर महिन्यात २ हजार ५६९ जीआर प्रसिद्ध केल्याची माहिती.
महाविकास आघाडीची जगवाटपासंदर्भात बैठक, विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर चर्चा.