Xi Jinping President Special Report : शी जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्रपती होणार? भविष्य काय असणार?
एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. शि जिनपिंग याचं काय होणार? हा प्रश्न अवघ्या जगाला पडलाय कारण, आजपासून चीनमध्ये सुरु झालंय सर्वात मोठं अधिवेशन. चीनमधील एकमेव कम्युनिस्ट पक्षाचे पंचवार्षिक अधिवेशन सुरु झालं. राष्ट्रपती जिनपिंग यांच्या भाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली. आठवडाभर चालणाऱ्या या अधिवेशनात पक्षाची आणि पर्यायाने देशाची ध्येयधोरणे निश्चित केली जातात. आणि याच आठ दिवसांमध्ये देशाच्या सर्वोच्च नेत्याचीही निवड केली जाते. खरंतर जिनपिंग यांचीच निवड जवळपास निश्चित आहे. पण, त्याची औपचारिक घोषणा बाकी आहे. जेव्हा ही घोषणा होईल, तेव्हा जिनपिंग चीनच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली नेते बनतील. पण, हा प्रवास ही सोपा नाहीय.. पाहुयात याच प्रवासाचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट
All Shows

































