Rahul Gandhi Yatra Special Report : गांधींच्या रॅलीत काँग्रेस नेत्यांना कोण धक्का मारतंय?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे.. सकाळी ६ पासून राहुल गांधी यांच्या यात्रेला सुरुवात झालीय.. ही यात्रा नांदेडच्या शंकरनगरहून नायगावमध्ये पोहोचलीय..उद्या रात्री नांदेड शहाराकडे कूच करणार आहे. त्यानंतर दुपारी चारनंतर आजच्या दिवसाचं दुसरं सत्र सुरु होईल. राहुल गांधी यांच्या यात्रेत काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकही सहभागी होताना पाहायला मिळाले... सकाळी यात्रा सुरु होताच राहुल गांधींना भेटण्यासाठी कोळी बांधव भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होतेे... यावेळी त्यांनी आपल्या समस्या राहुल गांधींना सांगितल्या.. तर काल बेरुळ घाटातून भारत जोडो यात्रा मार्गस्थ होत असताना शिवकालीन दृश्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडलं... २० ते २५ तरुण शिवकालीन मावळ्यांचा पोशाख परिधान करुन घोड्यांवर स्वार झाल्याचं पाहायला मिळालं...
All Shows































