एक्स्प्लोर

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना

Karmala Case Solapur : सोलापुरातील करमाळ्यामधील एका कंपनीत बिहारच्या कामगाराला संपवून आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर : करमाळा तालुक्यातील झरे फाटा येथील 'स्वराज्य सिमेंट पाईप कंपनी'च्या खोलीत एका कामगाराला लोखंडी हातोड्याने डोक्यात प्रहार करून निर्घृणपणे संपवलं. केवळ झोपेतून उठवल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हा थरार घडला आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेवकुमार मनोज शर्मा (मूळचा बिहारी, सध्या रा. झरे फाटा, करमाळा) असं मृत कामगाराचे नाव असून, आरोपी जयंतकुमार उमेश शर्मा हा घटनेनंतर पसार झाला आहे.

Karmala Incident Details : दरवाजा बंद करून झोपल्याने वाद

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 च्या सुमारास आरोपी जयंतकुमार शर्मा खोलीचा दरवाजा बंद करून झोपला होता. मयत महादेवकुमार शर्मा याला त्याच खोलीत झोपायचे असल्याने त्याने खिडकीतून दगड मारून जयंतकुमारला झोपेतून उठवले. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.

या भांडणाचा राग मनात धरून रात्री 11.40 च्या सुमारास महादेवकुमार गाढ झोपेत असताना, जयंतकुमारने लोखंडी हातोड्याने त्याच्या डोक्यात सपासप वार केले. अत्यंत गंभीर दुखापत झाल्याने महादेवकुमारचा जागीच मृत्यू झाला, तर आरोपी जयंतकुमार तिथेच हातोडा टाकून पसार झाला.

Solapur Police Action : करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. आणि करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी आरोपी जयंतकुमार उमेश शर्मा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 103(1) आणि 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासी पोलीस अधिकारी ढोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
Amravati Crime news: दोन वर्ष नीट बोलली; नंतर बिनसलं, बोलणं बंद केल्यानं तो संतापला, पाठलाग केला अन् अमरावतीत भर चौकात त्यानं वार करून संपवलं, चेहऱ्यावर ना खेद ना खंत
दोन वर्ष नीट बोलली; नंतर बिनसलं, बोलणं बंद केल्यानं तो संतापला, पाठलाग केला अन् अमरावतीत भर चौकात त्यानं वार करून संपवलं, चेहऱ्यावर ना खेद ना खंत
Nagpur Crime News: क्लासला जायचंय, पत्नीनं दिला जेवण बनवण्यास नकार, नवऱ्याची सटकली अन् त्याने..., नागपुरातील विवाहितेचा दुर्दैवी अंत
क्लासला जायचंय, पत्नीनं दिला जेवण बनवण्यास नकार, नवऱ्याची सटकली अन् त्याने..., नागपुरातील विवाहितेचा दुर्दैवी अंत
Pune Crime News: कुराश अन् ड्रॅगनबोट खेळांची बनावट प्रमाणपत्र दिली अन् 19 जणांनी पुणे पोलीस दलात मिळवली नोकरी, दोघांना बेड्या; नेमकं काय घडलं?
कुराश अन् ड्रॅगनबोट खेळांची बनावट प्रमाणपत्र दिली अन् 19 जणांनी पुणे पोलीस दलात मिळवली नोकरी, दोघांना बेड्या; नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
Mirzapur The Movie Actor Mohit Malik: 'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणाऱ्या 'या' तडफदार अभिनेत्याला ओळखलं?
'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणारा 'हा' तडफदार अभिनेता कोण?
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Embed widget