Walmik Karad Audio Clip : आका म्हणतो मीच बाप; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लिप व्हायरल Rajkiya Shole
वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाली. यात कार्यकर्त्याला सोडवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्याला विनंती करतानाचा आवाज कराडचा असल्याचं सांगितलंं जातंय. या संभाषणात कार्यकर्त्याला धीर देत इथे बाप बसलाय ना अशी बढाई मारताना ऐकू येतंय. कराड आणि पोलिसांच्या कथित संबंधांवरुन धस, दमानियांनी टीकेची झोड उठवली. दमानियांसह सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला तर आपल्यावरील आरोपांनी व्यथित, भावनिक झालेले धनंजय मुंडेही पाहायला मिळाले. काय झालं दिवसभरात पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.
वाल्मिक कराड आणि सायबर पोलीस अधिकारी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अधिक आक्रमक झाल्या आहेत..
या प्रकरणात वाल्मिक कराड आणि पोलिसांचे संबंध यावर त्यांनी शंका उपस्थित केली.
तर आमदार सुरेश धस यांनी बीड पोलिसांवरील आरोपांचा आणि बीड जिल्ह्यातील पोलीसांच्या बदल्या करा या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला.
या सगळ्या सनसनाटी दावे आणि खळबळजनक आरोपांमध्ये बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांनी सकाळी आणखी एका आरोपाची भर घातली. सरपंच हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळे जिवंत नसेल अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तर या शंकेला धनंजय मुंडेंनी आरोपांनीच प्रत्युतर दिलंय.
सुरेश धस म्हणाले तसं हा विषय आणखी महिना पंधरा दिवस चालणार आहे. तोवर नवनवे आरोप प्रत्यारोप सुरुच राहतील. धनंजय मुंडे राजीनामा देणार का? गृहमंत्री पोलिसदलावरील आरोपांना गांभीर्याने घेणार का? न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची वेळ येणार का?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील अशी आशा