(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur : विश्वजित काशीदचं 170 वेळा प्लेटलेट्स दान, प्लेटलेट डोनेशनसाठी गुडविल ब्रॅंड अॅम्बेसेडर
कोरोनाच्या संकटात रक्तचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून प्रशासन रक्तदान करण्याचं आवाहन करत आहे. अशा वेळी कोल्हापुरातील एका अवलियानं 170 वेळा प्लेटलेट दान केल्याचं समोर आलंय. विश्वजित काशीद असं या तरुणाचं नाव आहे. विश्वजीतचा रक्तगट हा एबी निगेटिव्ह आहे. या रक्तगटातील 170 वेळा प्लेटलेट दान करणारा विश्वजित हा भारतातील पहिला ठरला आहे.
अजूनपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात एबी निगेटिव्ह रक्तगटाच्या कोणत्याही व्यक्तीनं एवढ्या वेळ प्लेटलेट दान केल्या नाहीत. त्यामुळं विश्वजीत हा भारताचा प्लेटलेट्स डोनेशनसाठी गुडविल ब्रँड अम्बेसिडर बनला आहे. या सगळ्याची नोंद National blood transfusion council आणि WHO शिवाय Red cross यांच्याकडे ठेवली जाते. एक व्यक्ती 15 दिवसातून एकदा प्लेटलेट्स दान करु शकतो. म्हणजे वर्षात तो 24 वेळा प्लेटलेट्स दान करु शकतो. जर नागरिकांना जास्तीत जास्त प्लेटलेट्स दान केल्या तर सध्या लागणारा रक्ताचा पुरवठा 50 टक्क्यांवर येऊ शकतो.