Diwali and Farmer Special Report : अंधारातल्या शेतकऱ्याला हवा मदतीचा दिवा, आभाळ फाटलं, स्वप्न वाहिली
देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. तेजपर्व दिवाळीचा सण जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झालाय. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या दिवाळीवर परतीच्या पावसामुळे संकट उभं ठाकलंय.. तुम्ही कंदील लावून दिवाळीच्या स्वागताची तयारी करताय... मात्र तिकडे शेतकऱ्याच्या दिवाळीवर अंधाराचं सावट पसरलंय. तुम्ही फटाके खरेदी करुन दिवाळी धुमधडाक्यात साजरा करणार आहात.. मात्र शेतकरी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना वाचवण्याची धडपड करतोय.. गोडधोड फराळ आणि मिठाई खाऊन दिवाळीचा सण साजरा करणार आहात.. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय... नवीन कपडे घालून आपल्या कुुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्याचं तुम्ही प्लॅनिंग केलंय.. मात्र आभाळ फाटल्याने शेतकऱ्याची स्वप्नं वाहून गेलीत.. परतीच्या पावसाने क्षणात होत्याचं नव्हतं झालंय.. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर निर्माण झालेल्या या संकटकाळात शेतकऱ्याला साथ देण्याची गरज निर्माण झालीय...