Execution of Kerala woman Nimisha Priya : केरळची नर्स येमेनमध्ये कशी बनली गुन्हेगार? Special Report
Execution of Kerala woman Nimisha Priya : केरळची नर्स येमेनमध्ये कशी बनली गुन्हेगार? Special Report
ही कहाणी आहे परदेशात जाऊन केवळ उपजिविकेसाठीच नाही तर जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका महिलेची...८ वर्षांपूर्वी केरळमधून येमेनमध्ये गेलेल्या निमिषाची...उज्ज्वल भविष्याचं स्वप्न घेऊन येमेनध्ये गेलेल्या निमिषावर तिथं गुन्हेगाराचा शिक्का बसला...आता तर तिचं आयुष्यच पणाला लागलंय. डोळ्यांत मायदेशी परतून मुलीला भेटण्याचं स्वप्न आणि डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार...अशा अवस्थेत निमिषा सापडलीय...पाहुयात येमेनच्या तुरुंगात अडकलेल्या निमिषाची कहाणी...
निमिषा प्रिया...
येमेनमध्ये काम करणारी केरळमधली नर्स...
येमेनमध्ये अंधाराच्या गर्तेत सापडलेल्या निमिषाच्या जीवनात आशेचा एक किरण आलाय...
१६ जुलैला तिला मृत्युदंड देण्यात येणार होता...पण ती शिक्षा तूर्तास लांबणीवर टाकण्यात आलीय...
केरळमधल्या पलक्कडमधून येमेनपर्यंतचा प्रवास...
तिथं सरकारी रुग्णालयात नर्सची नोकरी...
आणि मृत्युदंडाची शिक्षा...
निमिषाची कहाणी एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही...
GFX IN
- २००८ मध्ये वयाच्या १९ वर्षी निमिषा प्रिया नर्सच्या नोकरीसाठी येमेनला
- २०११ मध्ये केरळमध्ये येऊन तिनं टॉमी थॉमस या इलेक्ट्रिशियनशी लग्न केलं
- २०१४ मध्ये निमिषानं येमेनमध्ये नोकरी सोडून क्लिनिक उघडण्याचा निर्णय घेतला
- पण व्यवयास सुरू करण्यासाठी येमेनी कायद्यानुसार निमिषाला स्थानिक भागिदार शोधणं आवश्यक होतं
- त्याचवेळी निमिषाला तलाल अब्दो महदी हा येमेनी तरुण भेटला
PTC IN
निमिषा आणि महदीची जवळीक वाढली...२०१५ मध्ये निमिषा आपला पती आणि मुलीला भेटायला केरळमध्ये आली होती. तेव्हा महदीसुद्धा तिच्यासोबत आला होता...तेव्हा महदीनं निमिषाच्या लग्नाचा फोटो चोरला...आणि फोटोशी छेडछाड करत निमिषाच्या नवरा असल्याचा दावा केला.
PTC OUT
GFX IN
- ५० लाख रुपये जमवून निमिषानं येमेनमध्ये स्वत:चं क्लिनिक सुरू केलं
- पण २०१६ पासून महदीनं निमिषाचं शारीरिक शोषण सुरू केलं
- क्लिनिकचा नफा हडपायला सुरुवात केली आणि निमिषाचा पासपोर्टही स्वत:कडे ठेवला
- त्रासाला कंटाळून जुलै २०१७ मध्ये निमिषानं महदीला बेशुद्ध करून पासपोर्ट मिळवण्यासाठी इंजेक्शन दिलं
- ओव्हरडोस झाल्यानं महदीचा मृ्यू झाला
- निमिषानं महदीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि पाण्याच्या टाकीत फेकले
- येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेनं निमिषाला फाशीची शिक्षा सुनावली
- २०१४ मध्ये येमेनच्या राष्ट्रपतींनी शिक्षेला मान्यता दिली
PTC IN
निमिषाच्या मृत्युदंडासाठी १६ जुलै २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली. निमिषाच्या सुटकेचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे मृताच्या कुटुंबीयांकडून माफी किंवा ब्लड मनी...ब्लड मनी म्हणजे मृताच्या कुटुंबीयांना भऱपाई देणं. निमिषाला माफी मिळवून देण्यासाठी तिच्या आईनं मालमत्ता विकून आणि क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून ब्लड मनी जमवायला सुरुवात केली. त्यासाठी २०२० मध्ये सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन काऊन्सिलची स्थापना करण्यात आली. मुलीला परत आणण्याच्या निर्धारानं निमिषाच्या आईनं येमेन गाठलं...
PTC OUT
VO
महदीच्या मृत्यूच्या बदल्यात त्याच्या कुटुंबीयांना साडे आठ कोटी रुपये देऊ करण्यात आले.
पण त्यांनी पैसे स्वीकारले नसल्यानं निमिषाच्या मृत्युदंडाची शिक्षा अटळ मानली जात होती...
एकीकडे भारत सरकारकडूनही निमिषाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते...
पण येमेनमध्ये हुती बंडखोरांची सत्ता असल्यानं राजनैतिक प्रयत्नांना मर्यादा येत होत्या...
दुसरीकडे धार्मिक नेत्यांच्या माध्यमातून महदीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू होते...
भारतातील कंथापुरमचे ग्रँड मुफ्ती एपी अबुबकर मुसलियार यांनी येमेनमधील प्रसिद्ध सुफी विद्वान शेख हबीब उमर बिन हाफिज यांना चर्चेसाठी राजी केलं...
महदीच्या मृताच्या भावानंही अखेर बोलण्याची तयारी दाखवली...
त्यामुळे निमिषाच्या सुटकेच्या आशेचा किरण दिसू लागलाय...
आता लांबणीवर टाकलेली तिची फाशीची शिक्षा रद्द होते का ते पाहायचंय...
All Shows
































