Special Report Village for Sale : कांद्याला भाव मिळेना, शेतकरी त्रस्त, थेट गावच विकायला काढलं
Special Report Village for Sale : कांद्याला भाव मिळेना, शेतकरी त्रस्त, थेट गावच विकायला काढलं
कांदा पिकाला भाव मिळावा, सरकारने अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी गळ्यात कांद्याची माळ घालून आंदोलन झालीत, निवेदने दिलीत रास्तारोको केला, एवढंच काय तर कांद्याची होळी ही केली, तरीही सरकार लक्ष देत नसल्याने नाशिकच्या देवळा तालुक्यातील साडेतीन हजार लोकवस्तीचे माळवाडी गाव चक्क विकायला काढले आहे. कांद्याचे दशावतार बघायला मिळत असल्याने कायमच रडण्यापेक्षा एकदाच काय तो निकाल लावावा यासाठी सरपंचसह ग्रामस्थांनी बैठक घेतली आणि एकमुखाने गाव विक्री करण्याचा ठराव केला.. गावातील साधारपणे साडेपाचशे हॅक्टर जमीन आहे. जवळपास 90 टक्के लोक कांदा शेती करतात. उदरनिर्वाहच साधनही कांदा शेतीच आहे. मात्र कांद्याला भावचं मिळत नाही, रहायचे कसे जगायचे कसे हा विचार मनात आला. आत्महत्या करून कुटुंब वाऱ्यावर सोडण्यापेक्षा कसत असणाऱ्या शेतीसह गावच विक्री ला काढण्याचा निर्णय घेतला, केंद्र आणि राज्य सरकार या दोघांपैकी कोणीही गाव विकत घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे.