Nashik Baby Kidnapping | नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची चोरी Special Report
आई होण्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही असं म्हटलं जातं
पण हा आनंद काही सगळ्यांच्याच नशिबी नसतो
आणि हाच मातृत्वाचा क्षण अनुभवण्यासाठी, उपभोगण्यासाठी एका महिलेने चक्क बाळाचीच चोरी केली
सीसीटीव्हीत दिसणारी ही महिला आहे सपना मराठे
तिने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळाची चोरी केली
खरं तर ही चोरी करताना तिने दोन दिवस रेकी केली
एका महिलेची नुकतीच प्रसूती झाली होती..
तिच्यावर या महिलेने पाळत ठेवली
तिच्याशी ओळख वाढवली
शनिवारी दुपारी १२ वाजता
तिने मुलं सांभाळते असं सांगितलं
आणि त्या लेकराच्या आईचा डोळा चुकवून
रुग्णालयातून पळ काढला
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली
आणि पोलिसांचा शोध सुरु झाला
बाईट:-अब्दुल खान- नवजात बाळाचे वडील(( युनिट वरून पाठवले आहे.,))
पोलिसांनी चक्र फिरवली
आणि काही तासांत बाळ चोरी करणाऱ्या महिलेला
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरातून अटक केली
दरम्यान तिच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे झाले
बाळ चोरणारी महिला
एमबीए पदवीधर
लेखापाल पदाची
परीक्षा देखील उत्तीर्ण
बाळ चोरणारी महिला
आणि तिचा पती
धुळ्यात वास्तव्यास
संबंधित महिलेचा
दोन वेळा गर्भपात
मूल होत नसल्याने
तिने बाळ चोरलं
कुटुंबाला प्रेग्नंट असल्याचं
सांगून गेल्या वर्षभरापासून
कुटुंबापासून दूर
बाळाची चोरी केल्यानंतर
महिला तिच्या घरी
गेली
दरम्यान या महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर
सपना मराठे ही खोटं बोलत असल्याचं समोर आलं
आणि तिचं बिंग फुटलं
पण या सगळ्यात आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो रुग्णालयाच्या सुरक्षेचा
याबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारलं असता
डिस्चार्जनंतर हा प्रकार घडल्याचं सांगत त्यांनी हात झटकले
या जगात येऊन काहीच तास झालेल्या
अजून नीटसे डोळेही न उघडलेल्या या बाळाभोवती
ही अशी संकटांची मालिका सुरु झाली.
पण असो, आता ते बाळ सुखरुप आपल्या आईच्या कुशीत विसावलंय.
आणि तेही नाशिक पोलिसांच्या सजगतेमुळे
पण मातृत्वाच्या सुखासाठी
बाळाच्या हव्यासापोटी
दुसऱ्याचं लेकरु चोरणं ही वृत्ती अमानवी आहे
शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक