Marathi Abhijaat Bhasha | मराठीला अभिजात दर्जा देणारा सरकारी आदेशच नाही Special Report
तारीख होती ३ ऑक्टोबर २०२४ आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो दिवस...
केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची घोषणा केली खरी
पण तीन महिेने लोटले तरी अजून यासंदर्भातलं अधिकृत पत्र किंवा शासन निर्णयसुद्धा निघालेला नसल्याचं आलेला नाही...
((केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्री व सचिवांशी पत्रव्यवहार... यासंदर्भात विचारणा... उत्तर नाही))
डॉ. श्रीपाद जोशींनी केंद्राला तीन पत्रं पाठवली पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं डॉ. जोशींचं म्हणणं आहे...
यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही प्रश्न उपस्थित केलाय
'अभिजात भाषेचा दर्जा' हा चुनावी जुमला होता का? अशी विचारणा राऊतांनी केली
((ज्यांनी ही घोषणा केली दिल्लीतून ट्विटर इथे पेढे वठले पण अद्याप GR नाही मग हा राजकीय जुमला होता का? काही भाषेंचा GR निघाला, मराठीचा का नाही?))
((मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच वेळी पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली या चार भाषानांही तो दर्जा मिळाला. यातल्या काही भाषांसाठी जीआरही निघाला. पण मराठीसंदर्भात का नाही? असा प्रश्न आता विचारला जातोय.))
'अभिजात मराठी'च्या या सगळ्या चर्चांवर थेट मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिलंय....
((अनेक वेळा अनेक लोकं योग्य माहिती न घेता बोलत असतात. त्यात सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात. त्या प्रक्रीया आपण पुर्ण केल्या आहेत. केंद्राने आपल्याला अभिजात दर्जा दिलेला आहे.))
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं आपल्या भाषेला एक उंची प्राप्त झाली, तिचा गौरव वाढला...
मात्र आता यासंदर्भातला जीआरही केंद्राकडून लवकरात लवकर काढला जावा हीच अपेक्षा... तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा, नागपूर