Special Report Vidhan Sabha Election : मिशन विधानसभा, जागांसाठी दावा उभा ABP Majha
Special Report Vidhan Sabha Election : मिशन विधानसभा, जागांसाठी दावा उभा, पाहा स्पेशल रिपोर्ट
हे देखील वाचा
Vidhan Parishad Election 2024: लोकसभा निवडणुकीतून अजितदादा गटाने धडा घेतला, विधानपरिषद निवडणुकीसाठी विदर्भातील 'या' मुस्लीम चेहऱ्याला संधी?
बुलढाणा: पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय गणिते लक्षात घेऊन या विधानपरिषद निवडणुकीतील (Vidhan Parishad Election 2024) उमेदवार ठरतील. त्यामुळे विधानपरिषदेच्या उमेदवारांची निवड अत्यंत कळीचा मुद्दा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम (Muslim) समाजाने केलेले मतदान निर्णायक ठरले होते. मुस्लीम व्होटबँक एकगठ्ठा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिल्याने महायुतीला फटका बसला होता. हीच गोष्ट लक्षात घेऊन अजितदादा गटाकडून (Ajit Pawar Camp) आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्यात आला आहे.
आगामी विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्याने अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Camp) विदर्भातून एक मुस्लिम उमेदवार दिल्या जाण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने सर्वात मजबूत दावेदार म्हणून ओळखले जाणारे गेल्या दहा वर्षांपासून बुलढाणा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी (Nazer Kazi) हे उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे. या अनुषंगाने येत्या सोमवारी नाझेर काझी यांना अजित पवारांनी भेटायला बोलावले असल्याचे खुद्द काझी यांनी "एबीपी माझा" ला सांगितले.