School Uniform Special Report :विद्यार्थ्यांच्या गणवेशावरुन वाद, Rohit Pawar - Deepak Kesarkar भिडले
शाळेचा गणवेश, राजकीय वस्त्रहरण
गणवेश योजनेवरुन कुणी घेतली शाळा?
गणवेश योजनेच्या कोणत्या मुद्यावर आक्षेप?
एक राज्य, एक गणवेश योजनेवरून अनेक राजकीय आरोप आणि प्रत्यारोप झाले... आणि आता विरोधकांनी एक फोटो सोशल मीडियावर जाहीर करत विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून सरकारचं वस्त्रहरण सुरू केलंय. सरकारचे चांगल्या गुणवत्तेच्या गणवेशाचे दावे खोटे असल्याचा आरोप करत आरोपांची राळ उठलीय... पाहूया त्याबाबतचा हा एक स्पेशल रिपोर्ट.
राज्य सरकारने गाजावाजा करत
एक राज्य एक गणवेश अशी योजना आणली...
क्वालिटीची गॅरंटी देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत हा गणवेश दाखवला...
मात्र विरोधकांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत गणवेशावरून
गणवेशावरून सरकारचं वस्त्रहरण सुरू केलंय
या चिमुकल्याने घातलेला
गणवेश प्रतिबिंब आहे,
महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचं!
पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला,
दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..
काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा.
विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा,
तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा
करून ठेवली आहे.
हापापाचा माल गपापा
करण्याच्या सर्व मर्यादा
या सरकारने ओलांडल्या आहेत.