PM Modi On Pakistan जब सिंदूर बारुद बन जाता है, पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा Special Report
पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून भारतानं पाकिस्तानला जोरदार दणका दिला...भारताच्या हल्ल्यात केवळ दहशतवाद्यांच्या छावण्याच नाहीत, तर पाकिस्तानचे एअरबेसही उद्ध्वस्त झालेत...एवढा मोठा दणका बसल्यानंतर पाकिस्ताननं शस्त्रसंधीसाठी गयावया केली...पण देशासमोर मात्र न झालेल्या विजयाचे नगारे वाजवायला सुरुवात केली...त्याच ढोंगी पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुुन्हा एकदा खरमरीत इशारा दिलाय...
पहलगामधल्या दहशतवादाही हल्ल्या महिना पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले राजस्थानात सीमेवरच्या बिकानेरमध्ये... बिकानेरमधल्या नाल एअरबेसवर त्यांनी हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधला... त्यानंतर एका सभेत बोलताना मोदींनी ऑपरेशन सिंदूरचं यश सांगत पाकिस्तानला कडक इशारा दिला...
पहलगामच्या हल्ल्याचा भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत १५ दिवसांनी बदला घेतला... पाकव्याप्त काश्मीरच नव्हे तर पाकिस्तानात एअर स्ट्राईक करून भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले... त्यात १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला... हल्ल्यासाठी सैन्यानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातली ९ ठिकाणं निवडली होती...
All Shows

































