Pandharpur : 22 गुंठ्यात 14 लाखांचे उत्पन्न , लॉकडाऊनमध्येही जिगरबाज शेतकऱ्याची करामत ABP Majha
कोरोना आणि लॉक डाऊन याचा सर्वात मोठा फटका शेतीमालाला बसताना दिसत आहे . शेतीमालाला भाव नसल्याने कष्टाने शेतात पिकविलेला माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे . अशावेळी केवळ २२ गुंठे क्षेत्रात चक्क १४ लाखाचे उत्पन्न मिळविण्याची किमया माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील भारत जाधव या शेतकऱ्याने करून दाखवली आहे . काही वर्षांपूर्वी ज्वारी , मका अशी पिके घेणाऱ्या भारत याना शेतीत गुरु भेटला आणि त्यांनी डाळिंब पिकाची वाट धरली . हळू हळू प्रयोग करीत डाळिंब उत्पादनात त्यांनी स्पेशालिटी मिळविली . भारत जाधव यांचे उपळाई येथे २७ गुंठ्याचा एक जमिनीचा तुकडा आहे . त्यातही चारी बाजूने बांध असल्याने केवळ २२ गुंठे क्षेत्रावर पीक घेता येते . यंदा त्यांनी या तुकड्यात २६० डाळिंब झाडावरील माल उतरविला असून यात १६ टन माल निघाला आहे ज्याला ८८ रुपये प्रति किलो दराने दर मिळाल्याने भारत जाधव मालामाल झाले आहेत .