Santosh Jagdale Kaustubh Ganbote Death : जिहादी अतिरेक्यांनी मैत्रीचाही गळा घोटला Special Report
पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात पुण्याच्या दोन मित्रांनी आपला जीव गमावला.. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे काश्मीरला सहलीसाठी गेले होतो. पण पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारुन या दोघांवर गोळ्या झाडल्या.... धक्कादायक हे की त्यांच्या कुटुंबीयांसमोरच हे सगळं घडलं...
लहानपणीपासूनचे दोन अतिशय जीवलग मित्र..
पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहणारे संतोष जगदाळे आणि रास्ता पेेठेत राहणारे कौस्तुभ गणबोटे..
सहकुटुंब जम्मू-काश्मीरचा आनंद लुटण्यासाठी गेले..
मात्र पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात या दोन मित्रांनी जीव गमावलाय..
अतिरेक्यांचा गोळीबार ऐकून व्यावसायिक असलेले संतोष जगदाळे,पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे यांनी जवळच्या तंबूत आसरा घेतला होता. मात्र जिहादी अतिरेकी तिथे पोहोचले आणि आसावरी जगदाळे यांच्या समोरच तंबुतून त्यांच्या वडिलांना आणि गणबोटेंना बाहेर नेलं. मुस्लिम आहात का हे विचारलं, नाव, धर्म विचारला, कलमा म्हणायला सांगितला आणि नंतर क्रूरपणे गोळ्या घालून ठार केलं.
All Shows

































