Nagpur Deekshabhoomi Parking Project : वादात नूतणीकरण; विरोधाचं कारण Special Report
नागपूरच्या दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण आणि नूतनीकरणाचं काम आता वादात सापडलंय... या नूतनीकरणाच्या कामात समाविष्ट असलेल्या पार्किंगला विरोध केला जातोय... अखेरीस जनभावनेचा रेटा पाहता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला स्थगिती दिलीय... पाहूयात, याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट...
लाखो अनुयायांचं श्रद्धास्थान असलेली नागपूरची
दीक्षाभूमी पुन्हा एकदा चर्चेत आलीय... पण
यावेळी त्याचं कारण आहे... दीक्षाभूमीच्या
सौंदर्यीकरण आणि नूतीकरणाच्या कामाचं...
आणि या कामाला कडाडून विरोध होण्यामागे
कळीचा मुद्दा ठरलाय अंडरग्राऊंड पार्किंगचा
मुद्दा... यावरून आंदोलक आक्रमक झाले आणि
त्यांनी आंदोलन करत कामाच्या साहित्याची
तोडफोड करत जाळपोळ केली... यावेळी पोलीस
आयुक्तांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा
घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती
नियंत्रणात आली.
मुख्य स्तूपाच्या चारही
प्रवेशदारांचे नूतनीकरण
मध्य प्रदेशातील सांची
येथील स्तूपाच्या धर्तीवर
चार तोरणद्वार
स्तूपाभोवती दगडी
परिक्रमा पदपथ
११ हजार ३१६ चौरस
फुटांचे व्याख्यान केंद्र
६६ फूट लांब, ५४ फूट
रुंद, १५ फूट उंचीचे
सभामंडप
दगडी सुरक्षा भिंतीचे
बांधकाम
३३ फूट रुंद, २० फूट
उंचीचे दोन मुख्य प्रवेशद्वार,
पोलीस नियंत्रण कक्ष
३७ फूट उंच असलेल्या
अशोकस्तंभासह दीक्षाभूमीचे
सौदरीकरण
१४६ कार, ९०२ दुचाकी
पार्क करण्याएवढं भूमिगत
पार्किंग
पार्किंगच्या छतावर
बसण्यासाठी जागा,
शोभेचे वृक्ष