एक्स्प्लोर

Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Illegal Liquor Racket : जुन्या दारूचा वापर करून त्यामध्ये पाणी आणि मद्यार्क मिळून नवीन बनावट दारू करण्याचा उद्योग सुरू होता. त्यावर कोल्हापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) मोठी धडक कारवाई करत बनावट दारू उत्पादन आणि विक्री करणारे रॅकेट (Illegal Liquor Racket) उघडकीस आणले आहे. जिल्ह्यातील हुपरी गावाच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 25 लाख 45 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल (Seized Liquor Worth Rs 25 Lakh) जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एकूण चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील दारूवरील कर वाढवल्यानंतर दारूच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यभर बनावट दारूचा सुळसुळाट झाल्याचं चित्र आहे.

सदरच्या गुन्ह्यात हुपरी गावातील वसंतराव पाटील, अरुण बुरुंगले आणि अमीन शिकलगार या आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक 1 ने ही कारवाई केली. या भरारी पथकामध्ये निरीक्षक सदानंद मस्करे, कांचन सरगर, सचिन लोंढे, विलास पवार, सागर शिंदे, संदीप जानकर, सुशांत बनसोडे, अमोल यादव, साजीद मुल्ला यांनी सहभाग घेतला.

हॉटेलच्या पार्किंगमधून अवैध दारूचा पर्दाफाश (Illegal Liquor Bust)

24 डिसेंबर 2025 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे भोगावती परिसरातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये छापा टाकला. या ठिकाणी जुन्या दारुच्या साठ्याचा वापर करून त्यामध्ये पाणी आणि मद्यार्क मिसळून नवीन बनावट देशी दारू तयार करत असल्याचं आढळलं. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध दारू, कच्चा माल आणि वाहने आढळून आली. तपासात हे संपूर्ण नेटवर्क बेकायदेशीररित्या बनावट दारू तयार करत असल्याचे आणि ते विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले.

25 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त (Seizure Details)

सदरच्या कारवाईत 2355.70 लिटर मद्य, अंदाजे 10 लाख 42 हजार रुपये किमतीची 2355.70 लिटर बनावट दारू, 91,500 रुपयांचा कच्चा माल, 14 लाख रुपये किमतीची वाहने, इतर साहित्य असा एकूण 25,45,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तीन आरोपींवर गुन्हा दाखल (Case Registered)

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये वसंतराव पाटील, अरुण बुरुंगले आणि अमीन शिकलगार यांचा समावेश आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

अवैध दारूविरोधात मोहीम तीव्र (Excise Department Action)

राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे की, अवैध दारू उत्पादन, साठवणूक आणि विक्रीविरोधात अशीच कडक कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget