Mahayuti Shiv Sena vs NCP vs BJP : निधीची कमी वादाची फोडणी? निकालानंतर महायुतीत खदखद? Special Report
भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी... महायुती या नावाने हे तीन पक्ष सत्तेत असले तरी लोकसभा निकालांनंतर रोज खदखद, धुसफूस सुरू झाल्याचं दिसतंय. महायुतीतल्या कुरबुरी रोज चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत... आता निमित्त घडलंय ते निधीवाटपाचं... शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार थेट अजित पवारांची तक्रार करू लागलेत. पाहूयात हा रिपोर्ट
निधीची कमी वादाची फोडणी?
निकालानंतर महायुतीत खदखद?
लोकसभा निवडणुकांंत सुमार कामगिरीनंतर
आता महायुतीच्या नेत्यांसमोर नवं आव्हान उभं राहीलंय.
हे आव्हान आहे आमदारांच्या नाराजीचं...
शिवसेनेच्या गोटातून नाराजीची
विविध कारणं समोर येऊ लागली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या समिक्षा बैठकीत
या नाराजीचा सामना मुख्यमंत्र्यांना करावा लागला.
शिवसेना आमदारांना निधी देण्यात अजित पवार दुजाभाव करत असल्याची तक्रार
अजित पवारांशी बोलून अटी शिथील करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची समीक्षा बैठकीत करण्यात आली
केंद्रात शिवसेनेचा योग्य सन्मान राखला गेला नसल्याची आमदारांची भावना
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करण्याची ठाम मागणी
लोकसभा निवडणुकांत उमेदवार जाहीर करण्यात उशीर केल्याबद्दल नाराजी
विधानसभेला लवकरात लवकर आमदार जाहीर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
ज्या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली नाही, त्या आमदारांना मुख्यमंत्र्यांची समज