Rahul Gandhiनिवडणुकांचा मुद्दा,लेखांतून गुद्दा;राहुल यांच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तरSpecial Report
कालचा शनिवार आणि आजचा रविवार हा दोन दिवसांचा वीकेंड राजकीय वर्तुळात चर्चेत राहिला तो राहुल गांधींनी केलेले आरोप आणि त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या उत्तरामुळं. शनिवारी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात लेख लिहित राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपनं महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक हायजॅक केल्याचा आरोप केला होता. त्यासाठी त्यांनी पाच मुद्देही मांडले होते. आज मुख्यमंत्री फडणवीसांनी या पाचही मुद्द्यांना लेखाच्या माध्यमातूनच उत्तरं दिली. मात्र यानंतरही विरोधकांचं समाधान झालं नसून त्यातून आणखी काही नव्या प्रश्नांचा जन्म मिळालाय. याचाच आढावा घेऊया, या खास रिपोर्टमधून.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही मॅचफिक्सिंग होती, असा आरोप करणारा लेख लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देशातल्या १४ वर्तमानपत्रांमध्ये लिहिला आणि राज्यासह देशभरात यावरून चर्चा सुरु झाली.
या लेखाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी आज वर्तमानपत्रातच लेख लिहून राहुल गांधींच्या आरोपांना उत्तरं दिली.
राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या पाचही मुद्द्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला.
राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री फडणवीस का देतायत, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांच्या लेखावर टीका केलीय.
All Shows

































