Lebanon Pager Blast Special Report : हल्ला डेंजर, फुटले पेजर...लेबनॉनमध्ये काय घडलं?
नवी दिल्ली : इस्त्रायल आणि हमास यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणाऱ्या पेजरचे स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. ती घटना मंगळवारी घडली होती. त्यानंतर आज राजधानी बेरुतमध्ये दोन स्फोट झाले. हे स्फोट वॉकी टॉकीमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोशल मीडियावरील माहिती नुसार यावेळी लॅपटॉप, वॉकी टॉकी आणि मोबाईलमध्ये ब्लास्ट झाले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 100 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणाऱ्या वॉकी टॉकीमध्ये देशातील दक्षिण भागात आणि राजधानीच्या दक्षिणेतील उपनगरांमध्ये स्फोट झाले आहेत. रिपोर्टनुसार काल एक स्फोट झाला होता. त्या घटनेतील मृतांवर जिथं अंत्यसंस्कार करण्यात येणार होते त्या जागेजवळ वॉकी टॉकीचा स्फोट झाल्याची माहिती आहे. मंगळवारी झालेल्या पेजर स्फोटात 3 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती होती. तर, 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हदथ टीव्हीच्या रिपोर्टनुसार लेबनॉनमध्ये झालेल्या वॉकी टॉकी स्फोटात 100 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.