Ajit Pawar Special Report : अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत टेन्शन, पुन्हा भाकरी फिरणार?
विकेंड स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत... सुरुवात करुयात अजित पवारांसंदर्भातील एका बातमीनं.. विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या कार्यशैलीमुळे जितके प्रसिद्ध आहेत, त्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या वकृत्वशैलीनं.. अजित पवारांचं भाषण ऐकण्यासाठी आजही चांगलीच गर्दी जमते.. गावरान शब्दांचा तडका देत अजित पवारांनी अनेक सभा गाजवल्यात.. पण, याच शैलीमुळे अजित दादा अडचणीतही आलेत. भाषणातील काही वक्तव्यांमुळे दादांना माफीही मागावी लागलीय.. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता दादांनी नेमकं काय वक्तव्य केलंय, की ज्यामुळे ते अडचणीत येतील... तर जरा थांबा, आता अजित पवारांनी जे वक्तव्य केलंय. त्यामुळे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांची चिंता वाढली असेल... काय आहे ते वक्तव्य.
All Shows

































