Mumbai BEST Bus : 'मुंबई' खड्ड्यात, प्रशासन व्यस्त भांडणात Special Report
मुंबईतल्या गिरगाव परिसरात सोमवारी सकाळी एक विचित्र अपघात घडला. रहदारीच्या रस्त्यावर बेस्टच चाक ५ फूट खोल खड्ड्यात गेलं. आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबई मेट्रोचं सुरू असलेल काम आणि पालिका प्रशासन याविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला... पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट....
मुंबईतल्या गिरगावातील मेट्रो स्टेशनजवळचा हा परिसर
याच रहदारीच्या आणि गजबजलेल्या भागात
सोमवारी सकाळी बेस्ट बसचा एक विचित्र अपघात घडला....
अचानक रस्ता खचला आणि बेस्टचं मागचं चाक खड्ड्यात रुतलं...
((व्हिज्युअल्स....))
वॉक थ्रू - निलेश बुधावले, प्रतिनिधी
((बस खड्ड्यात रुतली हे दाखवतानाचा पार्ट))
पण भर रस्त्यात हा खड्डा पडण्याचं कारण काय?
बाईट - स्थानिक
((आरोप... कारणं... मेट्रोच्या कामामुळे आणि बिल्डरचा कन्स्ट्रक्शन साईटमुळे पाणी जायला रस्ता राहिला नाही त्यामुळे जमीन खचली आणि अपघात झाला))
सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्या
त्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी झाली....
नागरिकांनी यावेळी रस्ता खचण्याला
मेट्रो प्रशासन आणि पालिका प्रशासनाला जबाबदार धरलंय...
बाईट - माजी नगरसेवक
((५० वेळा मी तक्रारी केल्या आहेत मात्र काहीच कारवाई केली नाही. मेट्रोच्या कामावेळी २ वर्षापूर्वी इथेच भली मोठी क्रेन पडली होती))
या सगळ्या प्रकरणासंदर्भात
एबीपी माझानं मेट्रो प्रशासनाशी संपर्क झाला
यावेळी मेट्रो प्रशासनानं आपल्यावरचे आरोप फेटाळलेयत
बाईट - टी. टी. यादव, गिरगाव मेट्रो इंचार्ज
((यात दोष नसून मेट्रोच काम देखील पूर्ण झालेल आहे. याठिकाणी सुरू असलेल्या एका बिल्डिंगच्या कामामुळे मोठे खड्डे घेण्यात आले आहेत. या खड्यातून पाण्यासोबत माती वाहून जाऊन रस्ता खचल्याचं म्हटलंय))
दुसरीकडे इथल्या शेजारच्या दुकानांमध्ये
रात्रभर पडलेल्या पावसानं पाणी साचलं होतं..
मेट्रो परिसरातही गुडघाभर पाणी होतं...
आणि याच भागात रस्ता खचून बेस्टचं चाक रुतलं...
पण या सगळ्यावर सध्या फक्त आरोप प्रत्यारोप सुरु आहेत...
पण कारवाई सध्या तरी शून्य.....
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई
All Shows

































