Sea Link Special Report : दोन सी-लिंक, दोन नावं, दोन विचारधारा ABP Majha
Sea Link Special Report : दोन सी-लिंक, दोन नावं, दोन विचारधारा ABP Majha
वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याचा निर्णय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या आधी तयार झालेल्या वरळी वांद्रे सी लिंकला राजीव गांधी यांचं नाव आहे... त्यामुळे मुंबईच्या वांद्रे येथे राजीव गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सी लिंक एकत्र येणार आहेत. वांद्रे वरळी सी लिंक तयार झाल्यानंतर त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव त्याला देण्यात यावं, अशी इच्छा बाळासाहेब ठाकरे यांची होती. मात्र त्यावेळच्या काँग्रेस सरकारच्या काळात वांद्रे वरळी सीलिंकला राजीव गांधी यांचे नाव देण्यात आलं आणि आता याच्याच पुढच्या भागाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आलाय... त्यामुळे हे दोन सागरी सेतू कसे एकत्र येणार ? स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू कधी तयार होणार ? आणि घेतलेल्या निर्णयावर राजकीय पक्षांचे नेमक्या भूमिका काय ?? पाहूया या रिपोर्ट मधून