Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातची राज्याच्या राजकारणात पाळंमुळं किती खोल रुजलीयेत, याची चर्चा सुरू असताना... आता त्याच्या मुलीची एक लग्नपत्रिका उजेडात आलीये... यात अर्धा डझन राजकीय नेत्यांची नावं प्रमुख पाहुणे म्हणून छापलीयेत... आता तुम्ही म्हणाल, की कुणाचंही नाव कुणीही छापू शकतो... पण मग याच नेत्यांची नावं का छापली? बाकीच्यांची का नाही? खरात प्रकरणात होत असलेल्या राजकारणावर हा स्पेशल रिपोर्ट...
सर्वपक्षीय नेत्यांसोबत अशोक खरातचे फोटो आणि व्हिडीओ समोर आलेत..
अनेकांनी त्या फोटो आणि व्हिडीओसंदर्भात स्पष्टीकरणही दिलंय
मात्र अशोक खरात हे प्रकरणच एवढं गंभीर आहे की फक्त स्पष्टीकरण देऊन यातून बाहेर पडणं सहज शक्य नाहीय
अशातच अशोक खरातनं ज्यांची नावं लग्नपत्रिकेत छापली आहेत,
ती मंडळी त्याच्या अधिक जवळची होती का? असा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे
सांगोल्याच्या राजकीय वर्तुळातलं एक मोठं नाव म्हणजे दीपक आबा साळुंखे...
आणि त्यांनी अशोक खरातच्या मुलीला फ्लॅट गिफ्ट दिल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी केलाय
तर सुषमा अंधारेंनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा माफी मागावी असं प्रतिआव्हान दिपक आवा साळुंखेंनी दिलंय
All Shows
































