पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
घाबरलेल्या सुमंतने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला फोन करून या घटनेबद्दल सांगितले. त्याने तिला एक मेसेज पाठवला आणि त्यानंतर हॉलमधील पंख्याला गळफास लावून घेतला.

Crime News: बंगळूरमध्ये कौटुंबिक वादातून एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना राजेश्वरी नगरच्या हेगनहल्ली परिसरात घडली. मृतांची ओळख 29 वर्षीय पद्मावती आणि 32 वर्षीय सुमंत जैन अशी पटली आहे. सुमंत सिव्हिल इंजिनिअर होता, तर त्याची पत्नी पद्मावती एका कॅब कंपनीत काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री या जोडप्यात जोरदार वाद झाला. रागाच्या भरात पती सुमंत जैनने पत्नी पद्मावतीवर हल्ला केल्याने हा वाद विकोपाला गेला. मिळालेल्या माहितीनुसार, पद्मावतीच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आणि ती बेशुद्ध पडली. जेव्हा सुमंतने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या लक्षात आले की तिचा श्वास थांबला आहे.
हॉलमधील पंख्याला गळफास लावून घेतला
यामुळे घाबरलेल्या सुमंतने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला फोन करून या घटनेबद्दल सांगितले. त्याने तिला एक मेसेज पाठवला आणि त्यानंतर हॉलमधील पंख्याला गळफास लावून घेतला. थोड्या वेळाने सुमंतच्या आईने तो मेसेज पाहिला आणि तत्काळ घरमालकाला कळवले. घराची झडती घेतली असता, सुमंत मृतावस्थेत आढळला. राजगोपाल नगर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मृत्यूचे कारण अद्याप अज्ञात
मृत पद्मावती मूळची हुबळीची असून एका कॅब कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती, तर तिचा पती सुमंत मूळचा दक्षिण कन्नडचा असून त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. या दोघांचे लग्न सुमारे चार वर्षांपूर्वी झाले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कौटुंबिक वादातून हिंसाचार झाल्याचे दिसून येते. तथापि, महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण आणि दोन्ही घटनांमधील संपूर्ण संबंध अद्याप अस्पष्ट आहे.
इतर महत्वाच्या बातम्या






















