Ajit Pawar Meet Sharad Pawar :दिवाळीत मतभेद, वाढदिवशी गाठभेट? महाराष्ट्रातील समीकरणं बदलणार? Special
Ajit Pawar Meet Sharad Pawar :दिवाळीत मतभेद, वाढदिवशी गाठभेट? महाराष्ट्रातील समीकरणं बदलणार? Special
शरद पवारांचा आजचा वाढदिवस राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरला तो अजित पवारांच्या भेटीमुळे. दिल्लीत अजित पवारांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली आणि नव्या चर्चांना उधाण आलं. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात रंगत असलेल्या ऑपरेशन लोटसचा आणि या भेटीचा काही संबंध आहे का, याचीही चर्चा सुरु झाली. कौटुंबिक नाती जुळवताना सत्तेचे आकडे नव्यानं जुळवण्याचा हा प्रयत्न आहे का, असाही सवाल विचारला जाऊ लागलाय.
लोकसभा निवडणुकीत ज्यांच्यावर सडकून टीका केली, त्या सुनेत्रा पवारांना नणंदबाई सुप्रियाताईंनी असं प्रेमाचं अलिंगन दिलं.
पुतण्या पार्थचं तर असा लाडाचा मुका देऊन जोरदार स्वागत केलं.
त्यानंतर पवार कुटुंबीयांसोबत केक-कटिंगचा जोरदार कार्यक्रमही झाला.
विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या दिवाळीला गोविंदबागेत न गेलेले अजित पवार काकांच्या वाढदिवसाला मात्र नात्यांचा गोडवा गाताना दिसले.
आपल्याला कुटुंबात वेगळं पाडल्याची टीका करणारे दादा आज मात्र आपण कुटुंबाचच भाग आहोत, असं सांगत होते.
नात्यांचा गोडवा, आकड्यांचं गणित
केंद्रात भाजपचे २४० खासदार
नितीश कुमारांचे १२ खासदार
चंद्राबाबू नायडूंचे १६ खासदार
अजित पवारांचा १ खासदार