Maharashtra Cabinet : भाऊ-दादा दिल्लीत पण भाई ठाण्यात; महायुतीत नाराजीचा पुढचा अंक? Special Report
Maharashtra Cabinet : भाऊ-दादा दिल्लीत पण भाई ठाण्यात; महायुतीत नाराजीचा पुढचा अंक? Special Report
२३ नोव्हेंबरला निकाल लागला, महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आलं..पण..मुख्यमंत्रीपदाचं नाव घोषित व्हायला ४ डिसेंबर उजाडला.. ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले.. पण..आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळाचा अजून पत्ताच नाही..कोण मंत्री बनणार आणि कोणाला कोणतं खातं मिळणार हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.. काही वेटिंग लिस्टवर आहेत.. काही आशेवर आहेत.. तर काही नशीबावर सगळा भार सोडून निवांत बसले आहेत.. दिल्लीतील भेटीगाठींनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची सद्यस्थिती काय आहे, त्याचा हा सविस्तर रिपोर्ट...
महायुतीकडे २३२ आमदार आहेत, त्यातल्या फक्त ४३ जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यामुळे जवळपास १९० आमदार निराश होणार आहेत. त्यातले महत्वाकांक्षी आमदार संतुष्ट ठेवणं, समाधानी ठेवणं यासाठी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना तारेवरची कसरत करावी लागू शकते...