Parbhani : आंदोलक बेलगाम, निष्पापांची होरपळ; व्यावसायिकांचं हजारोंचं नुकसान Special Report
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची माथेफिरुकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर परभणीतील आंबेडकरी अनुयायांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंदमध्ये शांततेत आंदोलन सुरू असताना काल दुपारी अचानकपणे एका टोळक आलं आणि त्यांनी धुडगूस घालून मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. याची झळ काहीही दोष नसणाऱ्या सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांनाही बसली. पाहूयात हा खास रिपोर्ट....
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची माथेफिरुकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर परभणीतील आंबेडकरी अनुयायांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंदमध्ये शांततेत आंदोलन सुरू असताना काल दुपारी अचानकपणे एका टोळक आलं आणि त्यांनी धुडगूस घालून मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. तसंच तोडफोड आणि जाळपोळही केली. पण या आंदोलनाची झळ यात काहीही दोष नसणाऱ्या सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांनाही बसली.चहाचा स्टॉल, पान टपरी, पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचं आणि स्थानिकांचं मोठं नुकसान झालंय.