एक्स्प्लोर
Water Crisis: ऐन दिवाळीत पनवेलमध्ये पाणीबाणी, टँकरमागे २-३ हजार रुपये घेतात,रहिवाशांचा आरोप
पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे, खारघर आणि कळंबोली परिसरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. CIDCO आणि पनवेल महापालिकेच्या अयोग्य नियोजनामुळे ऐन दिवाळीत लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे, ज्यामुळे टँकर माफियांनी दर वाढवले आहेत. एका नोकरदार महिलेने संतप्त सवाल केला की, 'बऱ्याच वेळा माझ्या सुट्ट्यासुद्धा पाण्याच्या समस्येमुळे झालेल्या आहेत, यावरती काहीतरी महानगरपालिकेनं तोडगा काढणं आवश्यक आहे.' अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक कुटुंबे रात्री उशिरापर्यंत पाण्याची वाट पाहतात आणि अखेर दोन ते तीन हजार रुपये मोजून खाजगी टँकर मागवतात. काही रहिवाशांनी तर बाटलीबंद पाणी वापरल्यामुळे कुटुंबातील सदस्य आजारी पडत असल्याचा दावा केला आहे.
All Shows
Advertisement
Advertisement




























