Mental Health Care : कोरोनाच्या संकटात कसं जपावं मानसिक आरोग्य? डॉ. सागर मुंदडा यांचं मार्गदर्शन
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये अनेकजण आजही घरातच आहेत. अनलॉकमुळं काही कामं सुरु झाली असली तरी अजूनही घरात असणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. अनेक लोक आपल्या घरातच बंद आहेत. त्यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तुम्हालाही अचानक राग येतो का?, अचानक खूश होता का?, अचानक राग अनावर होऊन आक्रमक होता? किंवा कोणाला राग आला तर त्याची खिल्ली उडवता का? याव्यतिरिक्त तणाव, कंटाळा, एखादी गोष्ट आठवण्यात त्रास होणं, निर्णय घेण्यास भिती वाटणं, एकाग्रता कमी होणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करत असाल तर तुम्हीही मूड स्विंग्सचे शिकार झाला आहात.
All Shows

































