Majha Katta Yasmin Shaikh : जन्माने ज्यू, पती मुस्लिम, वयाच्या शंभरीतही मराठी भाषेसाठी आग्रही
Majha Katta Yasmin Shaikh : जन्माने ज्यू, पती मुस्लिम, वयाच्या शंभरीतही मराठी भाषेसाठी आग्रही
भाषा हे संवादाचं नाही तर वादाचं माध्यम होतेय की काय असा प्रश्न पडतोय. त्यात प्रमाणभाषा श्रेष्ठ की बोली भाषेचा बाज देखणा हा तर वंशपरंपरागत मुद्दा झालाय. भाषा हे एक शास्त्र आहे, आणि प्रत्येक शास्त्राला नियम असतात, भाषेचे हे नियम म्हणजेच व्याकरण. अलंकार, विभक्ती, संधी, कारके, प्रयोग, अव्ययं, काळ, या सगळ्यांच्या विश्वात रममाण झालेलं एक व्रतस्थ व्यक्तिमत्व व्याकरणतज्ज्ञ यास्मीन शेख आजच्या आपल्या कट्ट्याच्या पाहुण्या आहेत.
माणसांना आपलसं करण्यासाठी सगळ्यात पहिले त्यांची भाषा आत्मसात करावी लागते. जन्माने ज्यू असूनही यास्मिन शेख यांनी महाराष्ट्राची माय मराठी आत्यंतिक मायेने आत्मसात केली.. आणि केवळ संवादाचं माध्यम म्हणून भाषेकडे न पहाता, मराठीच्या सर्वांगसुंदर अशा व्याकरणावर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. मराठी लेखन मार्गदर्शिका आणि मराठी शब्दलेखनकोश ही दोन पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. साहित्यातली तरलता त्यांनी व्याकरणात शोधली.
२१ जूनला यास्मीन शेख यांनी वयाची शंभरी गाठली. गेल्या काही दशकांत मराठीच्या प्रवाहात झालेले बदल, भाषेचं बदलतं रुप, बदलेले आयाम आणि भाषेवर झालेल्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांच्या त्या साक्षीदार आहेत. या प्रवाहाच्या भूतकाळातून वर्तमान येताना आणि वर्तमानातून भविष्याचा वेध घेताना यास्मीन शेख यांच्या अनुभवी नजरेला काय दिसतं? यासोबत इतरही मुद्द्यांवर अत्यंत ऋजू, प्रसन्न आणि मेधावान् व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधुया.
All Shows
































