Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे.

Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa ODI) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना 30 नोव्हेंबरला रंगणार असून रांची येथे या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचे सर्व खेळाडू रांचीत दाखल झाले आहेत. यादरम्यान, काल विराट कोहली (Virat Kohli) थेट भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एमएस धोनीच्या (MS Dhoni) रांचीमधील निवासस्थानी भेटीसाठी पोहोचला. त्यानंतर एमएस धोनी आणि विराट कोहली एकाच कारमध्ये (Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA) दिसले. यावेळी धोनी कार चालवत होता, तर कोहली त्याच्या बाजूला बसला होता.
MS DHONI AND VIRAT KOHLI TOGETHER IN THE SAME CAR. 😍❤️ pic.twitter.com/oGFirjPTo4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 27, 2025
VIRAT KOHLI AT MS DHONI’S RESIDENCE FOR DINNER. 🇮🇳pic.twitter.com/xfjtToQqC7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 27, 2025
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका संपल्यानंतर आता भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वनडे आणि टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्या वनडे मालिका रंगणार (Ind vs SA ODI Schedule) आहे. यासाठी काल रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) रांची येथे दाखल झाले आहेत. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका असेल तर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येईल. शुभमन गिलला (Shubhman Gill) दुखापत झाल्यामुळे केएल राहुल टीम इंडियाच्या (Team India) वनडे संघाचं नेतृत्व सांभाळेल.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ- (Team India Squad Against SA)
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.
भारतविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ- (South Africa Squad Against Team India)
टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, रुबिन हर्मन, केशव महाराज, मार्को जॅनसेन, एडेन मार्कराम, लुंगी एनगिडी, रायन सुबरेन, प्रिलेटन.





















