#MajhaKatta : इथेनॉलचं महत्त्व ओळखणारे 'इथेनॉल मॅन' प्रमोद चौधरींसोबत खास गप्पा : Pramod Chaudhary
मुंबई : प्राज इंडस्ट्रिज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी एबीपी माझाला आज मुलाखत दिली. सुरुवातीला केवळ टेलिफोन आणि टाईपरायटरसोबत स्थापन करण्यात आलेल्या प्राज उद्योग विश्वाचा आज मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. जगातील पाच खंडातील तब्बल 75 देशांमध्ये त्यांची उलाढाल आहे. त्याचसोबत मार्केट कॅप साधारण सात कोटींच्या घरात आहे. 1200 ते 1250 कर्मचाऱ्यांचं हे कुटुंब आता आणखी मोठी झेप घेणार आहे. जैवऊर्जा, गुंतागुंतीच्या प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रणा आणि औद्योगिक सांडपाण्याचं व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये या कंपनीला जागतिक ओळख आहे. या संपूर्ण जीवनप्रवासातील गंमती, धक्के, समोर आलेली संकटं असे सर्व किस्से एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात त्यांनी सांगितले.
All Shows

































