Stranger Things season 5 episode 9 update: नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
Stranger Things season 5 episode 9 update: 'स्ट्रेंजर थिंग्स' ही नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय बेव सिरीजपैकी एक ठरली आहे. क्रिकेटपटू रोहित शर्मानेही या मालिकेचे प्रमोशन केले होते.

Stranger Things season 5 episode 9 update: सध्या नेटफ्लिक्लवर गाजत असलेल्या स्ट्रेंजर थिंग्ज या वेब सिरीजचा शेवटचा सिझन नुकताच प्रदर्शित झाला. स्ट्रेंजर थिंग्जच्या (Stranger Things) शेवटच्या सिझनची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर हा सिझन दोन टप्प्यात रिलीज झाला. या सिरीजचा शेवटचा एपिसोड 31 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. या वेब सिरीजमधील सर्वात लोकप्रिय पात्र असलेली EI इलेव्हन ही शेवटच्या भागात आपल्या मित्रांपासून दुरावल्याचे दाखवण्यात आले आहे. हा शेवट 'स्ट्रेंजर थिंग्ज'च्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाणारा ठरला. हा शेवट अनेकांना पचनी पडलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या 'स्ट्रेंजर थिंग्ज'च्या आणखी एका सिक्रेट एपिसोडची चर्चा रंगली आहे. सुरुवातीला 'स्ट्रेंजर थिंग्ज'चा हा सिक्रेट एपिसोड 7 जानेवारीला प्रदर्शित होईल, असे सांगितले जात होते. मात्र, नेटफ्लिक्सने पाचव्या सिझनचा आठवा एपिसोड हाच 'स्ट्रेंजर थिंग्ज'चा शेवट असल्याचे स्पष्ट केले होते. (Netflix Web Series)
नेटफ्लिक्सच्या या स्पष्टीकरणानंतर अजूनही सोशल मीडियावरील 'स्ट्रेंजर थिंग्ज'च्या सिक्रेट एपिसोडची चर्चा अजून थांबलेली नाही. शेवटच्या एपिसोडमध्ये माईकने EI इलेव्हन जिवंत असल्याची एक शक्यता बोलून दाखवली होती. हाच धागा पकडून सध्या सोशल मीडियावर EI इलेव्हनच्या कमबॅकची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर या थिअरीनुसार Abyss डायमेन्शनमध्ये व्हिलन असलेल्या Vecna ने शेवटच्या लढाईत एक वेगळीच चाल खेळल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वजण Vecna च्या फॉल्स रिअॅलिटीच्या जाळ्यात अडकले असू शकतात. प्रचंड शक्तिशाली असलेल्या Vecna ला पूर्णपणे हरवणे शक्य नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने परत येणाऱ्या Vecna चा मृत्यू खूपच सहज वाटत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर 'स्ट्रेंजर थिंग्ज'च्या शेवटच्या सिक्रेट एपिसोड येणारच, असा ठाम विश्वास अनेकजण व्यक्त करत आहेत.
अनेकांच्या मते या संपूर्ण सिरीजमध्ये हॉकिन्स शहराचे जे रुप दाखवण्यात आले आहे, ते शेवटच्या एपिसोडमध्ये दिसत नाही. लोकांचे पेहरावापासून अनेक गोष्टींमध्ये बदल असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या बेवसिरीजचे दिग्दर्शक असलेल्या डफलर ब्रदर्सनी आणखी एका एपिसोडची शक्यता फेटाळून लावली आहे. येत्या 12 जानेवारीला 'स्ट्रेंजर थिंग्ज'च्या पडद्यामागील गोष्टींवरचा एक एपिसोड रिलीज होणार आहे. या एपिसोडचे नाव 'वन लास्ट अॅडव्हेंचर', असे आहे. या बेव सिरीजमधील माईक, इलेव्हन, डस्टीन, विल, लुकास आणि मॅक्स या व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या.























