(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : 15 Sept 2024 : 6.30 AM
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज धुळ्याच्या शिंदखेडा दौऱ्यावर, सकाळी एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयाच्या मैदानावर शेतकरी मेळाव्यात राहणार उपस्थित
मविआ चे तिकीट आपल्यालाच मिळणार असा दावा करीत भगीरथ भालके यांची पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील 96 गावांमध्ये जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात. परिणामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे वातावरण तापण्याची शक्यता.
भंडारा जिल्ह्यातल्या १७० गावांना अतिवृष्टीचा फटका, ८ हजार ६८९ शेतकऱ्यांचं पुरामुळे नुकसान, कुठल्याही प्रकारची मानवी किंवा पशुधनाची हानी झाली नसल्याचं अहवालात समोर.
भंडाऱ्यात नैसर्गिक संकटांचा सामना करताना शेतकऱ्यांचं स्वप्न पूरपरिस्थितीमुळं उद्ध्वस्त, दुबार पेरणीतून सावरलेल्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीनं हिरावला.
कपाशी पिकाची वाढ होत नसल्यानं आणि निसर्गाच्या लहरीपणा कंटाळून अकोल्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यानं पिकावर फिरवला ट्रॅक्टर.
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अमरावतीमध्ये भाजप खासदार अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत शेतकऱ्यांनी मानले सरकारचे आभार.