Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 18 Sep 2024
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं थाटात विसर्जन, बाप्पासमोर ढोल-ताशासह पारंपरिक वाद्यांचं सादरीकरण.
पुण्यातील पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जन, नटेश्वर घाटावर बाप्पाला निरोप.
पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणपतीची मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आरती, मिरवणुकीआधी बाप्पासमोर शंखनाद.
कोल्हापुरात बंदी असताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर, पोलिसांच्या सूचना मंडळांनी पाळल्या नाहीत.
परभणीच्या जिंतूरमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेमुळे एकाचा मृत्यू, 2 जण अत्यवस्थ
अकोल्यातील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनादरम्यान बुडून एकाचा मृत्यू, उपचारादरम्यान १८ वर्षीय मुलाचा मृत्यू.
इंदापूरच्या नीरा नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा बुडाला, मुलाचा शोध सुरु.
वर्षभर मराठा समाजाचा लढा सुरुये,याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाईट वाटायला हवं.मुख्यमंत्र्यांच्या आवाहानानंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया.
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना जालन्यातील वडीगोद्री येथे पोलिसांनी रोखलं. वाघमारे यांनी अंतरावली सराटीत जाऊन आमरण उपोषण करण्याचा दिला होता इशारा. नवनाथ वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका.