Top 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 4 PM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ ऑक्टोबरला घोडबंदरच्या कासारवडवली भागात दौरा, घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्याचा निर्णय.
नवरात्रीत रात्री सव्वा बारापर्यंत मेट्रो सेवा, तर अंधेरी-गुंदवलीदरम्यान ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान १२ अतिरिक्त फेऱ्या
मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना सुरुवात, गुणवत्ता तपासणीसाठी आयआयटी मुंबईची नेमणूक, ‘आयआयटी’ ने गुणवत्ता तपासणी काटेकोरपणे करावी, महापालिका आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश.
मुंबईच्या सीमाशुल्क विभागाकडून गांजा तस्करीचा पर्दाफाश, १ कोटी ३४ लाख रुपये किमतीचा गांजा खाद्यान्नातून लपवून आणणाऱ्या प्रवाशाला मुंबई विमानतळावर अटक, हा प्रवासी बँकॉकमधून आल्याची माहिती.
मुख्यमंत्र्यांची भेट होत नसल्यानं आरोग्य विभागाचे विद्यार्थी आक्रमक, परीक्षा होऊन आठ महिने झाले, मात्र नियुक्ती आदेश दिले नसल्यानं संतप्त विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, ३० ते ४० विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात.
अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सखोल चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन, राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली सर्व घटनांचा तपशीलवार तपास होणार.
बदलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष शैलेश वडनेरेकडून कंपनी मालकाला मारहाण, कामगारांना कामावरून काढून टाकल्याने मारहाण केल्याची माहिती.
सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आजारी मुलांना घेऊन पालकांचं आंदोलन, पैसे नको सुदृढ आरोग्य देण्याची पालकांची मागणी, मुलांना लस मिळत नसल्यानं आजारी पडत असल्याचा पालकांचा आरोप.