IND vs PAK : पाकिस्तानी खेळाडूनं फलंदाजी करताना ICC चा नियम मोडला, आयसीसीची कारवाई फिक्स, दंड होणार, नेमकं प्रकरण काय?
IND vs PAK Asia Cup Super 4: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपच्या सुपर-4 मध्ये लढत सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या एका खेळाडूनं आयसीसीचा नियम मोडला.

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील सुपर फोर फेरीतील लढत सुरु आहे. या सामन्यात भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय गेतला. पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बाद 171 धावा केल्या. साहिबजादा फरहानच्या अर्धशतकामुळं पाकिस्ताननं ही धावसंख्या गाठली. पाकिस्तानचा फलंदाज हुसेन तलत यानं फलंदाजी करत असताना आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन केलं आहे. वरुण चक्रवर्तीच्या 11 ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर वरुण आणि संजू सॅमसन यानं एलबीडबल्यूची अपिल केली होती. यावेळी हुसेन तलत यानं चूक केली.
पाकिस्तानच्या खेळाडूकडून आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन Pakistani Cricketer Hussain Talat Breaks ICC Rule
पाकिस्तानी क्रिकेटर हुसेन तलत यानं टीम इंडियानं अपील करताच पंचांना बॉल बॅटला लागल्याचं सांगितलं. हुसेन तलत आणि साहिबजादा फरहान या तिघांनी त्याच बॉलवर तीन धावा काढल्या. आयसीसीच्या नियमानुसार कोणताही फलंदाज एलबीडब्ल्यूचं अपील झाल्यानंतर स्वत: तो बॉल त्याच्या बॅटला लागलाय की नाही हे सांगू शकत नाही. हुसेन तलत यानं आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन केलं आहे. भारत पाकिस्तान मॅचचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट आहेत. पाकिस्तानच्या टीमनं यापूर्वी त्यांच्यावर आक्षेप घेतले होते. त्यामुळं अँडी पायक्रॉफ्ट आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं म्हणून हुसेन तलत याच्यावर दंडात्मक कारवाई करु शकतात.
कुलदीप यादवनं घेतली विकेट
पाकिस्तानचा फलंदाज हुसेन तलत यानं क्रिकेट नियमांचं उल्लंघन केलं मात्र तो या मॅचमध्ये भारताविरुद्ध मोठी खेळी करु शकला नाही. तो 11 बॉलमध्ये 10 धावा करुन बाद झाला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर हुसेन तलतचा कॅच वरुण चक्रवर्तीनं घेतला. कुलदीप यादवनं एक कॅच सोडला होता. मात्र त्यानं हुसेन तलत याची विकेट घेतली. कुलदीप यादव सुपर 4 मध्ये पाकिस्तान विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 31 धावा देत एक विकेट घेतली.
भारताचा दणदणीत विजय
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमने सामने आले आहेत. साहिबजादा फरहान यानं 58 धावा केल्या.भारताच्या फिरकी गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. सॅम अयूब 21 धावा, मोहम्मद नवाझ 21 आणि फहीम शरीफनं 20 धावा करत पाकिस्तानला 171 धावांपर्यंत पोहोचवलं. यानंतर भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. अभिषेक शर्माच्या 74 धावा, शुभमन गिल 47 धावा यामुळं भारताचा विजय सोपा झाला. या दोघांच्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या यांनी भारताला विजयापर्यंत पोहोचवलं. तिलक वर्मानं 30 धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारतानं पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत केलं.























