एक्स्प्लोर

GST Reforms : जीएसटी सुधारणा लागू होताच एक दोन नव्हे 375 वस्तूंचे दर कमी होणार, जाणून घ्या कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होणार

GST 2.0:  जीएसटीचे 12 टक्के आणि 28 टक्क्याचे स्लॅब रद्द करण्याचा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे. या निर्णयामुळं 375 वस्तूंचे दर घटणार आहेत.  

GST 2.0 नवी दिल्ली: GST 2.0 उद्या म्हणजेच 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. जीएसटी परिषदेनं 22 सप्टेंबरपासून 12 टक्के आणि 28 टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं घरातील किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं, ऑटोमोबाईलसह आणखी वस्तू स्वस्त होतील. जीएसटी रिफॉर्म्सनुसार 375 वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी होणार आहेत. 

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटीचे स्लॅब 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि  28 टक्क्यांवरुन कमी करुन 5 आणि 18 टक्के  ठेवले आहेत. याशिवाय सिगारेट, तंबाखू, दारु यासारख्या गोष्टी 40 टक्के जीएसटीत आणलेत. वित्तमंत्री नि्र्मला सीतारामण यांनी जीएसटी सुधारणांचा निर्णय सामान्य आणि मध्यमवर्गाला दिलासा देणारा आहे.  नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जीएसटी सुधारणांची घोषणा केली होती.  

जीएसटी सुधारणांमुळं कोणत्या वस्तू स्वस्त होणार? GST Reforms impact on Price  

उद्यापासून ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, किचनमधील आवश्यक वस्तू आणि औषधांसह 375 हून अधिक गोष्टींचे दर बदलणार आहेत.  

दूध, कॉफी, कंडेंस्ड मिल्क, बिस्कीट,लोणी, धान्ये, कॉर्नफ्लेक्स, २० लिटरचा पाण्याचा जार, सुकामेवा,  फळांचा रस, तूप, आईस्क्रीम, जाम आणि जेली, केचअप, स्नॅक्स, चीज, पेस्ट्री, सॉसेज आणि मीट, नारळ पाणी या सारख्या खाण्या पिण्याच्या गोष्टी स्वस्त होतील. याशिवाय  आफ्टर-शेव लोशन, फेस क्रीम, फेस पाउडर, हेअर ऑयल, शाम्पू, शेविंग क्रीम, टॅल्कम पाऊडर, टूथब्रश आणि टॉयलेट सोपचे दर कमी होतील. 

 इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंमध्ये एअर कंडीशनर, डिशवॉशर, टीव्ही,वॉशिंग मशीनचे दर घटतील. औषधांच्या किमती देखील कमी होणार आहेत. डायग्नोस्टिक कीट, ग्लूकोमीटर यासारख्या उपकरणांवरील जीएसटी कमी करुन 5 टक्के करण्यात आली आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार सरकारनं औषधांच्या दुकानांना जीएसटी रिफॉर्म लक्षात घेत एमआरपीमध्ये बदल करुन किंवा औषधं कमी दरानं विकण्याचे निर्देश दिले आहेत. सलून, फिटनेस सेंटर, हेल्थ क्लब आणि योगासाठीच्या जीएसटीत देखील कपात करण्यात आलीय. ज्याचा फायदा लोकांना होईल. 
 
सीमेंटवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन कमी करुन 18 टक्के करण्यात आली आहे. ज्यामुळं घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. यामुळं रिअल इस्टेट सेक्टरला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. जीएसटी सुधारणांमुळं ऑटो सेक्टरला सर्वाधिक फायदा होणार आहे. ज्यात सेस टॅक्स 35 ते 50 टक्क्यांनी कमी करुन 40 टक्के करण्यात आला आहे. जीएसटी सुधारणा जाहीर होताच अमूल, एचयूएल, लॉरियल आणि हिमालया यासरख्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget