ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. देशात उद्यापासून बचत उत्सव, आता केवळ 5 आणि 18 टक्केच GST, देशाला डझनभर कररचनेतून बाहेर काढले, नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संबोधन https://tinyurl.com/4mj8m74a कार, दुचाकी, टीव्ही, सिमेंट ते घरबांधणीची सामग्री उद्यापासून होणार स्वस्त; किती रुपयांनी दर होणार कमी, एका क्लिकवर यादी https://tinyurl.com/5n8m2mpe
2. आमदाराला 2 कोटी निधी मिळतो, पण मी आमदार नसताना मला 20 कोटी मिळतात, सदा सरवणकरांचे वक्तव्य चर्चेत; शिवसेना आमदार महेश सावंतांचा पलटवार, म्हणाले, सत्ताधारी आमदारांना खैरात वाटली जातेय https://tinyurl.com/twxd95pz ठाकरेंच्या शिवसेनेचे मावळचे पराभूत उमेदवार संजोग वाघेरे राष्ट्रवादीत येणार का? अजित पवार म्हणाले, संजोग वाघेरे ठाकरे यांच्यासोबत आहेत, त्यांची पत्नी उषा वाघेरे ह्या आमच्यासोबत आहेत. असे अनेकांच्या घरात, आमच्यासह उदाहरणे आहेत https://tinyurl.com/yc65j7kj
3. नितीन गडकरी म्हणाले, मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचे आमच्यावरील सर्वात मोठे उपकार; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पलटवार, म्हणाले, जावे ज्यांच्या वंशा तेव्हा त्यांना कळे https://tinyurl.com/53cfk89w आरक्षणाच्या संघर्षावर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे https://tinyurl.com/mvwczhzf
4. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीन-तीन कोटी खर्च होतो, 100 बोकडं दिली जातात; संजय गायकवाडांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/mpf4ybpk सुषमा अंधारेंनी अंजली दमानियांना घेरल्यानंतर रोहित पवारांचे तीन सवाल; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममधील गादी आणि सोफ्यासाठी 20 लाख रु. खर्च केले जातात हे योग्य आहे का? https://tinyurl.com/4k8388dh
5. मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी गळ्यातील उपरणी काढून पाटलांना झाकलं, सहीसलामत बाहेर काढलं https://tinyurl.com/k6hndst9 जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न; सदावर्ते पती-पत्नीने घेतली जालन्यातली धनगर आंदोलकांची भेट https://tinyurl.com/ffaj9shm
6. ओबीसी नेत्यांना लक्ष्मण हाकेंचे वावडे; बीडमध्ये छगन भुजबळांच्या उपस्थितीत महाएल्गार सभा, हाकेंना निमंत्रण नसल्याची जोरदार चर्चा https://tinyurl.com/4csm7nya मला 1 मिनिटांत 15 ते 20 कॉल धमक्या देणारे येतात; पैसे मागितल्याच्या कॉल रेकॉर्डींगवरुन लक्ष्मण हाकेंचा खुलासा, म्हणाले, जावीणपूर्वक बदनामीचा डाव https://tinyurl.com/4cfycyep
7. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या NEET परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, पुढच्यावर्षी लेखी नव्हे तर ऑनलाईन परीक्षा होण्याची शक्यता, केंद्रीय स्तरावर हालचालींना वेग https://tinyurl.com/nhhxh8cc पुण्यातील चाकण मेट्रो विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, वाहतूक कोंडी कायमची सुटण्यासाठी प्रयत्न; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत लावली बैठक https://tinyurl.com/4dsrm9tk
8. उत्तर प्रदेश ATS पथक मुंबईत, भिवंडीतून तिघांना अटक; दहशतवादी कारवायांतील सहभागाचा संशय, लखनौला नेऊन होणार तपास सुरू https://tinyurl.com/bdh9cswy कोथरुडमध्ये पोलिसांनी भाईंची धिंड काढली; घायवळ गँगच्या गुंडांना बघून रस्त्यावरचे कुत्रे भुंकायला लागले https://tinyurl.com/4cwbum6m
9. 'इव्हेंट मॅनेजरनं फसवलं, पोलिसांनाही गंडा लावलाय'; देवमाणूस फेम अभिनेत्री अस्मिता देशमुखने व्हिडीओ शेअर करत सगळं सांगितलं https://tinyurl.com/yv9f6wuc 'राज ठाकरेंनी भेटायला बोलावलं, म्हणाले, आज संजय आलाय, आपण सर्व हिंदीत बोलूयात; संजय मिश्रा यांनी माझा कट्टावर सांगितला 'राज भेटीचा' किस्सा https://tinyurl.com/yp58z53d
10. हस्तांदोलन वादानंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान आज भिडणार; आशिया चषकच्या सुपर-4 मध्ये रात्री 8 वाजता रंगणार सामना https://tinyurl.com/4a4va6aw क्रिकेट अंडर-19 मध्ये कर्णधार आयुष म्हात्रे फ्लॉप, वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा घातला धुमाकूळ; 172.73 च्या स्ट्राइक रेटने 22 चेंडूत ठोकल्या 38 धावा https://tinyurl.com/4zc6s4ca
*एबीपी माझा स्पेशल*
हातातोंडाशी आलेलं उभं पीक वाहून गेलं, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीनं खरिपाच्या पिकांचं मोठं नुकसान; बळीराज्याच्या डोळ्यात अश्रू https://tinyurl.com/bdhdp8ht
शारदीय नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ग्रहांचा शुभ संयोग; 3 राशींवर असणार देवीची कृपा, संकटातून होणार सुटकाhttps://tinyurl.com/2sb9554b
H-1B व्हिसासाठी फक्त एकदाच शुल्क आकारणार, जुन्या व्हिसाधारकांचं काय होणार? व्हाईट हाऊसकडून खुलासा https://tinyurl.com/ye2xe2fv

























