Zomato कडून शाकाहारींसाठी 'Pure Veg Fleet' सर्व्हिस सुरु; सोशल मीडियावर होतेय सडकून टीका
Zomato Launhes Pure Veg Fleet : झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 'Pure Veg Fleet' आणि 'Pure Veg Mode' लॉन्च केलं आहे.
Zomato Launhes Pure Veg Fleet : ऑनलाईन फूड डिलीव्हरी (Food Delivery) कंपनी झोमॅटो (Zomato) आपल्या ग्राहकांना नवीन सेवा आणि सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करत असते. नुकतीच झोमॅटोने शुद्ध शाकाहारींसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि मांसाहारी पदार्थ ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणाहून जर तुम्हाला अशा ठिकाणाहून जेवण घेण्यापासून जर टाळायचं असेल तर अशा लोकांसाठी झोमॅटोने ही सेवा सुरु केली आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 'Pure Veg Fleet' आणि 'Pure Veg Mode' लॉन्च केलं आहे. या प्युअर व्हेज मोडमध्ये फक्त व्हेज ग्राहकांसाठी रेस्टॉरंट्सचा समावेश केला आहे. ज्या हॉटेल्समध्ये मांसाहारी पदार्थ मिळतात अशा रेस्टॉरंट्सना यापासून दूर ठेवलं जाईल.
Zomato CEO ने सोशल मीडियावर दिली माहिती
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या सेवेचे वर्णन करताना झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल म्हणाले, की हा प्युअर व्हेज मोड आणि प्युअर व्हेज फ्लीट कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा राजकीय पक्षाच्या सेवेसाठी आणलेला नाही. प्युअर व्हेज रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करू इच्छिणाऱ्या लोकांना या माध्यमातून विशेष सेवा मिळणार आहे. गोयल यांनी पुढे लिहिले की, "भारतात जगातील सर्वात जास्त शाकाहारी लोक राहतात. तसेच, आतापर्यंत आम्हाला मिळालेल्या फीडबॅकमधून हेच दिसून आलंय की शाकाहारी लोक हे आपल्या जेवणाच्या बाबतीत फार अलर्ट असतात, काळजी घेतात. आपल्याला समोर आलेलं अन्न कसं शिजवलं आहे याबाबत ते फार सतर्क असतात."
सोशल मीडियावर टीका
या सेवेबाबत काही लोकांनी सोशल मीडियावर झोमॅटोच्या सीईओवर टीका केली आहे. एका युजरने कमेंट करून लिहिले की, 'झोमॅटोच्या प्युअर व्हेजमुळे भेदभाव होऊ शकतो. "अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा लोकांनी फूड डिलीव्हरी नाकारली कारण डिलिव्हरी एजंट मुस्लिम होते. त्यांनी वापरलेला युक्तिवाद देखील असा होता की "आमच्या अन्नाची शुद्धता खराब होऊ नये असं आम्हाला वाटत नाही". मला आश्चर्य वाटणार नाही जर ' शुद्ध शाकाहारी' झोमॅटो उपक्रमामुळे अधिक भेदभाव झाला पाहिजे.' दुसऱ्या यूजरने लिहिलं की, ' मी माझ्या फोनमधून हे ॲप काढून टाकतोय.' मी पुन्हा कधीही Zomato चा वापर करणार नाही.' हे जातीयवादी आणि एक प्रकारे गुन्हेगारी आहे. यावर कोणीतही गुन्हा दाखल करावा अशी आशा आहे.' असे अनेक यूजर्स झोमॅटोच्या या उपक्रमाची टीका करतायत. तर, काही यूजर्सकडून पाठिंबाही मिळतोय.
India has the largest percentage of vegetarians in the world, and one of the most important feedback we’ve gotten from them is that they are very particular about how their food is cooked, and how their food is handled.
— Deepinder Goyal (@deepigoyal) March 19, 2024
महत्त्वाच्या बातम्या :