एक्स्प्लोर

World Sleep Day 2024 : झोपेशी संबंधित जडणारा आजार 'स्लीप ॲप्निया' म्हणजे काय? 'या' गोष्टी टाळा

World Sleep Day 2024 : ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियामध्ये व्यक्तीच्या घशाचे स्नायू शिथिल होतात आणि श्वासनलिकेत अडथळा निर्माण करतात त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास देखील बंद होऊ शकतो.

World Sleep Day 2024 : चांगली झोप (Sleep) ही मानवी शरीराला (Health) फार गरजेची आहे. झोप पूर्ण झाली तर आरोग्यही चांगलं राहतं. पण, जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर यामुळे अनेक आजारांना आमंत्रणही मिळतं. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍप्निया (Sleep Apnea) (ओएसए) हा एक झोपेसंबंधित विकार आहे. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियामध्ये व्यक्तीच्या घशाचे स्नायू शिथिल होतात आणि श्वासनलिकेत अडथळा निर्माण करतात त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास देखील बंद होऊ शकतो. नेमका हा आजार काय आहे आणि यावर तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊयात.  

या संदर्भात नवी मुंबईचे फुफ्फुसविकार तज्ज्ञ, मेडिकवर हॉस्पिटल्सचे डॉ. शाहिद पटेल म्हणतात की, 'संपूर्ण आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. अनेकदा ओएसएचे उशीराने निदान होते तसेच वेळीच उपचार केले जात नाही. त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.

1. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍप्निया (ओएसए)ची सामान्य लक्षणे ओळखणे जसे की मोठ्याने घोरणे, दिवसा जास्त झोप लागणे, झोपेच्या वेळी गुदमरणे किंवा दम लागणे आणि सकाळी डोकेदुखीचा त्रास सतावणे.

2. लठ्ठपणा, वाढलेले वय, लिंग, कौटुंबिक इतिहास आणि काही शारीरिक वैशिष्ट्ये (उदा. लहान जबडा, टॉन्सिलचा आकार ) यासारखे जोखीम घटक समजून घ्यावे.

3. उच्च रक्तदाब, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार, स्ट्रोक आणि दृष्टीदोष टाळण्यासाठी संशयित ओएसएचे वैद्यकीय मूल्यमापन करण्यात आणि वेळीच निदान करणे आवश्यक आहे.

काय करावे आणि करु नये?

ओएसएच्या प्रभावी व्यवस्थापनामध्ये जीवनशैलीतील बदल, उपचार पद्धती आणि तीव्रता वाढवणारे घटकांपासून दूर राहणे यांचा समावेश होतो.

'हे' करायला विसरु नका

झोपेचे मूल्यांकन करा : निदानाकरिता आणि ओएसएची तीव्रता निश्चित करण्यासाठी झोपेचा अभ्यास (पॉलिसॉम्नोग्राफी) यांसह सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी पल्मोनोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

योग्य उपचार करा : योग्य उपचार पद्धतीचा वापर करा. ज्यामध्ये सतत CPAP थेरपी, तोंडावाटे वापरण्यात येणारी उपकरणे, थेरपी, वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियांचा समावेश असू शकतो.

निरोगी जीवनशैली राखणे : नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. निरोगी जीवनशैलीचं पालन करा.  

झोपेची सवय बदला : झोपेचे योग्य वेळापत्रक तयार करा, आरामदायी आणि चांगले झोपेचे वातावरण तयार करा, झोपण्यापूर्वी गॅजेट्सचा वापर मर्यादित करा आणि शांत झोप घ्या.

लक्षणांकडे लक्ष द्या : लक्षणे किंवा उपचारांच्या परिणामांबाबत जागरुक राहा आणि कोणत्याही समस्या आढळल्यास वैद्यकिय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

'हे' टाळा :

लक्षणांकडे दुर्लक्ष करणे : ओएसएची लक्षणे नाकारणे किंवा त्याकडे दुर्लक्ष केल्याने स्लीप ऍप्निया होऊ शकतो आणि भविष्यात गुंतागुंत वाढू शकते. ओएसएची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नका.

उपचार अचानक बंद करु नका : वैद्यकिय सल्ला न घेता CPAP थेरपी किंवा इतर उपचार बंद करणे टाळा, कारण यामुळे लक्षणे वाढू शकतात आणि भविष्यात गुंतागुंत होऊ शकते.

अल्कोहोलचे सेवन टाळा : झोपेच्या वेळी अल्कोहोलचे सेवन टाळा. कारण त्यामुळे श्वसनमार्गात अडथळा येऊन झोपेत अडथळे येऊ शकतात.

फॉलोअपकडे दुर्लक्ष करणे : उपचारांच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेवण्यासाठी, आवश्यकतेनुसार थेरपी घेण्यासाठी नियमित फॉलो-अप करा.

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या बातम्या :

Mental Health : आयुष्य निरर्थक वाटू लागलंय? उदासीनपणा वाटतोय? 'या' टिप्स फॉलो करा, All Is Well!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget