एक्स्प्लोर

WhatsApp Update : व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आणलं भन्नाट फिचर, आता एक अकाऊंट चार मोबाईलमध्ये वापरता येणार!

याआधी युजर्सना एका मोबाईलमध्ये एकच व्हॉट्सअॅप अकाऊंट वापरता येत होतं. पण आता एक व्हॉट्सअॅप अकाऊंट चार मोबाईल डिव्हाईसेसमध्ये वापरता येणार आहे.

WhatsApp Update : आपल्यातील बहुतांश जणांकडे मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केलेलं असतं. यामुळे आपण अनेकांशी कनेक्ट राहण्यास मदत मिळते. व्हॉट्सअॅपकडून युजर्सना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्यासाठी कायमच प्रयत्न केले जातात. यात युजर्ससाठी भन्नाट फिचर्सही आणले जातात. पण यावेळी व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणलं आहे. हे नवीन अपडेट अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी आहे. या नवीन अपडेटची व्हॉट्सअॅप (WhatsApp Update) युजर्सही अतुरतेने वाट पाहत असतात. या नवीन अपडेटनुसार, आता एक व्हॉट्सअॅप अकाऊंट एकापेक्षा जास्त मोबाईल डिव्हाईसेसला कनेक्ट करता येणार आहे. याआधी व्हॉट्सअॅप अकाऊंट कम्प्युटर आणि लॅपटॉपसारख्या डिव्हाईसेसवर वापर केलं जातं होतं. पण स्मार्टफोन्सवर वापरता येतं नव्हतं. परंतु, आता व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी एक नवीन भन्नाट फीचर आणलं आहे. या फीचरचा कसा वापर करायचा? हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया...

व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरमुळे कसा फायदा होईल?

याआधी युजर्सना एका मोबाईलमध्ये एकच व्हॉट्सअॅप अकाऊंट वापरता येत होतं. आता नवीन अपडेटनुसार एक व्हॉट्सअॅप अकाऊंट चार मोबाईल डिव्हाईसेसमध्ये वापरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा वापर केल्यामुळे साईन आऊट करण्याची आवश्यकता नाही. तसेच नवीन मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप ओपन केल्यामुळे तुमची व्हॉट्सअॅप चॅटही डिलिट होणार नाही. त्यामुळे युजर्सना हे नवीन फीचर प्रचंड पसंत पडणार आहे. परंतु हे नवीन फिचर छोट्या व्यावसायिकांसाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे. या नवीन फीचरमुळे एकाच WhatsApp Business अकाऊंटवरुन कोणत्याही ग्राहकांशी संवाद साधता येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना हे फीचर जास्त पसंतीस उतरणार आहे. 

एक व्हॉट्सअॅप अकाऊंट अनेक मोबाईलमध्ये कसं वापरायचं?

व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरमुळे जास्तीत चार मोबाईल डिव्हाईसेसमध्ये कनेक्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी व्हॉट्सअॅप  लिंक करण्याची प्रोसेस नेहमीसारखीच असणार आहे. तुम्ही कम्प्युटरच्या डेस्कटॉपवर ज्याप्रमाणे व्हॉट्सअॅप लिंक करता तसंच लिंक करायचं आहे. लिंक करण्याची प्रोसेस खाली दिली असून स्टेप समजून घ्याल.

1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप अकाऊंट ओपन करा.
2. More Options > लिंक्ड डिव्हाईसवर क्लिक करा.
3. यानंतर Link a device वर लिंक करा.
4. तुमचा फोन अनलॉक करा.
5. तुमच्या मोबाईल दुसऱ्या डिव्हाईसच्या स्क्रिनसमोर पकडून क्यूआर कोड स्कॅन करा आणि तुमचं व्हॉट्सअॅप लिंक होईल.
6. यानंतर तुमचं व्हॉट्सअॅप खातं दुसऱ्या मोबाईलमध्ये ओपन होईल. 

या सहा स्टेप पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअॅप  खातं इतर मोबाईल फोन्समध्ये वापरता करण्याची सुविधा मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget