एक्स्प्लोर

Stay Safe With WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपकडून नवीन सिक्युरिटी फीचर्स लाँच; अकाऊंट पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार

Stay Safe with WhatsApp : नवीन सिक्युरिटी फिचर्समुळे ऑनलाइन घोटाळे, फसवणूक आणि अकाऊंटमध्ये होणारी छेडछाड यांसारखे धोके टाळण्यास मदत होणार आहे. 

Stay Safe with WhatsApp : Whatsapp ने आपल्या यूजर्ससाठी नवीन सिक्युरिटी फिचर्स आणलं आहे. या नवीन सिक्युरिटी फिचर्समुळे तुमचे अकाउंट पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. या फिचर्समध्ये Account Protect, Device Verification आणि Automatic Security Codes इत्यादींचा समावेश असणार आहे. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपने अलीकडेच 'Stay Safe with WhatsApp' मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये यूजर्संना सिक्युरिटी फिचर्स आणि टूल्सची माहिती मिळणार ​​आहे. ही मोहीम जवळपास 3 महिने सुरु राहणार आहे. 

WhatsApp ने आपल्या नवीन ब्लॉग पोस्टद्वारे नव्या सिक्युरिटी फिचर्सबद्दल माहिती दिली आहे. Account Protect, Device Verification आणि Automatic Security Codes फिचर्स युजर्सच्या व्हॉट्सअ‍ॅप  अकाउंटला सुरक्षिततेच्या दृष्टीने आधीपेक्षा अधिक मजबूत करेल. यामुळे ऑनलाईन घोटाळे, फसवणूक आणि अकाऊंटमध्ये होणारी छेडछाड यांसारखे धोके टाळण्यास मदत होणार आहे. 

अकाऊंट प्रोटेक्ट

Account Protect फिचर तुमच्या WhatsApp अकाऊंटमध्ये एका डिव्‍हाइसवरून दुसऱ्या डिव्‍हाइसवर अनधिकृत लॉगिन होण्‍यास प्रतिबंध करतो. हे फिचर सुरू झाल्यानंतर, जर कोणी दुसऱ्या डिव्हाइसवरुन तुमच्या WhatsApp खात्यात लॉगइन केलं, तर लॉगइन करण्यापूर्वी जुन्या डिव्हाइसवरून त्याचं अप्रूव्हल मागितलं जाणार आहे. याचा फायदा असा होणार की, जर कोणी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या डिव्हाइसवर सुरु करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लगेचच याबाबतचा अलर्ट मिळणार आहे. 

डिवाइस वेरिफिकेशन

मालवेअर हा सध्या मोबाईल उपकरणांसाठी सर्वात मोठा धोका मानला जातोय. Device Verification फिचर तुमच्‍या डिव्‍हाइसचे मालवेअरपासून संरक्षण करते. Device Verification हे फीचर मालवेअरला तुमच्या डिव्हाइसचा वापर करुन कोणालाही संदेश पाठवण्यापासून रोखतो. 

ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड

Automatic Security Codes अंतर्गत, व्हॉट्सअ‍ॅप ने “Key Transparency” नावाचा एक नवीन फिचर सादर केला आहे. हे फिचर युजर्संना Encryption tab वर क्लिक करुन ऑटोमॅटीकली सुरक्षित कनेक्शन व्हेरिफाय करण्याची अनुमती देतो. 

व्हॉट्सअ‍ॅप आणणार भन्नाट फीचर, कंटेट क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरणार

दरम्यान, या आधी अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ने आपल्या युझर्ससाठी भन्नाट फीचर आणणार आहे. या भन्नाट फीचरमुळे युजर्स आपले व्हॉट्सअ‍ॅप  स्टेटस  (WhatsApp Status) थेट फेसबुकवर (Facebook) पोस्ट करु शकतात. या व्हॉट्सअ‍ॅप फीचरमधील चांगली गोष्ट म्हणजे युजर्सना आपल्या प्रत्येक स्टोरीसाठी सेटिंग्समध्ये बदल करण्याची सुविधा देण्याता आली आहे. जर तुम्हाला एकच स्टेटस फेसबुकवर शेअर करायचं असेल आणि दुसरं तर तर ही फारच सोप गोष्ट असणार आहे. मात्र, सध्या या फीचरवर काम सुरु असून लवकरच ते लॉन्च होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
Sanjay Gaikwad Buldhana : बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Embed widget