WhatsApp Edit Message Feature : व्हॉट्सअॅपवर चुकीचा किंवा अपूर्ण मेसेज आता करता येणार एडिट!
WhatsApp Edit Message Feature : व्हॉट्सअॅप या इन्स्टंट चॅटिंग अॅपवर ज्या फीचरची युझर्स आतुरतेने वाट पाहत होते, ते अखेर त्यांच्यासाठी उपलब्ध झालं आहे. कंपनीने आपल्या यूजर्ससाठी मेसेज एडिट करण्याचा पर्याय आणण्यास सुरुवात केली आहे.
WhatsApp Edit Message Feature : व्हॉट्सअॅप (WhatsApp) या इन्स्टंट चॅटिंग अॅपवर ज्या फीचरची युझर्स आतुरतेने वाट पाहत होते, ते अखेर त्यांच्यासाठी उपलब्ध झालं आहे. कंपनीने आपल्या यूजर्ससाठी मेसेज एडिट करण्याचा पर्याय आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या हे फीचर काही लोकांच्याच अॅपवर दिसत आहे. लवकरच हे फीचर सगळ्यांच्या व्हॉट्सअॅपमध्ये उपलब्ध होईल. जर तुम्हाला अपडेट मिळत नसेल तर तुम्ही प्लेस्टोअरवर जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करु शकता. या फीचरच्या मदतीने यूजर्स चुकीचे टाईप झालेले किंवा पाठवलेले अपूर्ण मेसेज एडिट करु शकतात. परंतु यासाठी विशिष्ट कालमर्यादा देखील आहे.
मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांने स्वत: या फीचरची माहिती दिली आहे. सर्वात आधी हे फीचर आयओएस मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध झालं आहे.
व्हॉट्सअॅपवर बऱ्याचवेळा मेसेज पाठवताना टायपिंग मिस्टेक होतात तर काही मेसेज चुकून पाठवले जातात. त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं असतं. अशा परिस्थितीत सध्या Delete For Everyone फीचरच्या मदतीने संबंधित मेसेज डिलीट करुन पुन्हा पाठवावा लागत होता. त्यामुळे मेसेज रिसिव्ह करणाऱ्या युझरला एखादा मेसेज डिलीट का केला याचं उत्तर द्यावं लागत होतं. परंतु या नव्या फीचरमुळे हे कटकट कमी झाली आहे.
फक्त 15 मिनिटापर्यंतचे मेसेज एडिट करता येणार!
या नव्या फीचरमध्ये व्हॉट्सअॅपवर तुम्ही फक्त 15 मिनिटांपूर्वी पाठवलेला मेसेज एडिट करु शकाल. या वेळेनंतर तुम्हाला मेसेज एडिट करायला असेल तर तो तुम्हाला करता येणार नाही. ही वेळेची मर्यादा यासाठी लावली आहे की, कोणीही त्यांनी म्हटलेल्या एखाद्या गोष्टी पाठ फिरवू नये. जर वेळ मर्यादा नसेल, तर युझर कधीही कोणताही मेसेज एडिट करु शकतो.
कॉल, मेसेज आणि मीडिया प्रमाणेच 'एडिटेड मेसेज' देखील एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील. तुम्ही एडिट केलेला मेसेज समोरील युझरला एडिट केलेला दिसतो, मात्र त्याला एडिटेड हिस्टरी दिसणार नाही.
मेसेज एडिट कसा करायचा?
व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट कराला मेसेज केल्यानंतर कोणता मेसेज एडिट करायचा असेल तो सिलेक्ट करा. मेसेज एडिट करण्यासाठी तुम्हाला तो मेसेज लॉन्ग टॅप म्हणजेच दीर्घकाळ धरुन ठेवावा लागेल. यानंतर तुम्हाला एडिट मेसेजचा पर्याय दिसेल. एडिट मेसेजवर टॅप केल्यानंतर तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये बदल करु शकता आणि सेंड केलेल्या मेसेजवर टाईप करताच ओरिजनल मेसेजच्या ठिकाणी एडिटेड मेसेज दिसू लागेल.
व्हॉट्सअॅपमध्ये नवीन अॅड केलेलं फीचर
व्हॉट्सअॅपने नुकतेच युजर्सना चॅट लॉक फीचर दिले आहे. चॅट लॉक फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या वैयक्तिक चॅट लॉक करु शकतात. चॅट लॉक करण्यासाठी, तुम्हाला ज्या चॅट लॉक करायच्या आहेत त्या प्रोफाईलवर जाऊन एनेबल चॅट लॉक या पर्यायावर क्लिक करावं लागेल. असं केल्यास चॅट दुसर्या फोल्डरमध्ये शिफ्ट होईल, ज्याचा अॅक्सेस फक्त तुम्हालाच असू शकतो.