एक्स्प्लोर

बाजारात आलंय 'डिजिटल कंडोम', सगळीकडे उडालीय खळबळ; प्रायव्हेट मुव्हमेंट्समध्ये कसं करतं काम?

What is Digital Condom: जर्मनीतील सेक्सुअल वेलनेस ब्रँड बिली बॉय कंपनीनं हे 'डिजिटल कंडोम' लॉन्च केलं आहे. या अॅपचं नाव Camdom आहे.

What is Digital Condom: 'डिजिटल कंडोम' लॉन्च झालं आणि संपूर्ण बाजारात खळबळ माजली. ऐकून काहीसं विचित्र वाटलं असेल ना? पण, खरंच मार्केटमध्ये 'डिजिटल कंडोम' लॉन्च झालं आहे. हे एक अॅप आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे अॅप नक्की काम काय करतं? जर्मनीतील सेक्सुअल वेलनेस ब्रँड बिली बॉय कंपनीनं हे 'डिजिटल कंडोम' लॉन्च केलं आहे. या अॅपचं नाव Camdom आहे, जे ब्लूटूथ टेक्नॉलजीचा वापर करुन तुमचे प्रायव्हेट क्षण सुरक्षित करतं. कपलमध्ये इंटिमेसी दरम्यान, प्रायव्हसी राखण्यासाठी जर्मन कंपनीनं हे अॅप डेव्हलप केलं आहे. 

Camdom अॅप तयार करणाऱ्या कंपनीनं दावा केला आहे की, हे अॅप ब्लूटूथला कनेक्ट होऊन कॅमेरा आणि मायक्रोफोनची रेकॉर्डिंग बंद करण्याची क्षमता ठेवतं. म्हणजेच, जर तुम्ही हे अॅप वापरत असाल, तर शारीरिक संबंधांवेळी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची रेकॉर्डिंग करता येत नाही. कंपनीनं या अॅपला एक टॅगलाईनही दिली आहे. ‘As Easy As Using A Real Condom’ अशी टॅगलाईन कंपनीनं दिली आहे.  

हे कॉमन कंडोम नसून एक ॲप आहे. हे अॅप तुमचा फोन सीक्रेट मोडमध्ये ठेवतं. जेव्हा हे ॲप अॅक्टिव्ह असतं, तेव्हा स्मार्टफोनचा कॅमेरा आणि माईक तुमच्या परवानगीशिवाय काहीच रेकॉर्ड करू शकणार नाही. अनेकदा अशा प्रसंगी व्हिडीओ किंवा व्हॉईस रेकॉर्डिंग केल्याचं पाहायला मिळतं. पण, हे अॅप अशा गोष्टी रोखतं आणि तुमची प्रायव्हसी जपतं. 

डिजिटल कंडोम कशी करणार तुमची मदत? 

 जर्मन कंपनी बिली बॉयचं डिजिटल कंडोम अॅप लोकांना इंटिमेसी दरम्यान, स्कँडलमध्ये अडकण्यापासून बचव करण्यास मदत करतं. हे कंडोम लॉन्च झाल्यापासूनच लोक याबाबत अनेक गोष्टी बोलत आहेत. स्मार्टफोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोन बंद करण्यासाठी हे ॲप ब्लूटूथ कनेक्टिविटी वापरतं.   कंपनीनं दावा केल्यानुसार, या कंडोमचा वापर करणं अत्यंत सोपं आहे. 

डिजिटल कंडोम नेमकं कसं काम करणार? 

डिजिटल कंडोम अॅप म्हणजेच, Camdom चा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अॅप सुरू करावं लागेल. त्यानंतर वर्च्युअल बटन स्वाईप करा, त्यानंतर फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोन बंद होतो. जर एखादा पार्टनर जाणूनबुजून लपूनछपून व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत असेल, तर अॅप अॅक्टिव्ह होतं. त्यानंतर लगेच अलार्म वाजतो आणि युजरला अलर्ट केलं जातं.

कंपनीचा दावा आहे की, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा वापर करून, ते तुम्हाला तुमच्या संमतीशिवाय फोटो काढण्यापासून, व्हिडीओ काढण्यापासून किंवा ऑडिओ रेकॉर्ड करण्यापासून रोखतं. सेक्स करण्यापूर्वी यूजर्सना त्यांचा स्मार्टफोन जवळ ठेवावा लागतो. त्यानंतर ॲपमध्ये दिलेलं व्हर्च्युअल बटण खाली स्वाईप करून ते सक्रिय केलं जाऊ शकतं. CamDome ॲप सर्व ब्लूटूथ-कनेक्ट केलेल्या उपकरणांचे कॅमेरे आणि माईक शोधतो आणि बंद करतो.

जेव्हा अॅपशी जोडलेले डिव्हाइस अनब्लॉक करावे लागतात, तेव्हा अनब्लॉक बटण 3 सेकंद दाबून ठेवावं. हे सर्व डिव्हाइस आपोआप डिस्कनेक्ट होतील. याला बनवणाऱ्या 'बिली बॉय' कंपनीचा दावा आहे की, ते एकाच वेळी अनेक उपकरणांवर काम करू शकतात. बिली बॉयनं इनोशियन बर्लिन कंपनीच्या मदतीनं हे अॅप तयार केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aurangabad News: 'कंडोम इंडस्ट्री' औरंगाबादची नवीन ओळख, महिन्याकाठी 36 देशांत 100 मिलियन कंडोमची विक्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 डिसेंबर 2024 : ABP MajhaOne Nation One Election : एक देश एक निवडणूक समितीच्या शिफारसीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 डिसेंबर 2024 : ABP MajhaChhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Horoscope Today 17 December 2024 : आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
IPO Update : पैसे तयार ठेवा, या आठवड्यात  9 आयपीओ येणार, 3500 कोटींची उभारणी, कमाईची मोठी संधी 
आयपीओची मालिका सुरुच, आठवड्यात 3500 कोटींचे 9 IPO येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी 
Chhagan Bhujbal: अजित पवारांनी ताकदवान छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का वगळलं?
छगन भुजबळांसारख्या ताकदवान ओबीसी नेत्याला अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का वगळलं?
Embed widget