(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Upcoming Smartphone: OnePlus चे 'हे' दोन फोन जुलै महिन्यात होणार लाँच, फोनमध्ये मिळणार भन्नाट फिचर्स
Upcoming Smartphone: भारतात जुलै महिन्यातील 5 तारखेला OnePlus दोन स्मार्टफोन लाँच होणार आहे. यामध्ये Oneplus Nord 3 आणि Nord CE 3 फोनचा समावेश आहे. Nord 3 फोनचे काही डिटेल्सही समोर आले आहेत.
OnePlus Nord CE 3: सध्या स्मार्टफोन कंपन्या जबरदस्त फिचर्सचे फोन बाजारात आणत आहेत. जुलै महिन्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन लाँच होणार आहेत. यामुळे ग्राहकांना फोन विकत घेण्यासाठी चांगला पर्याय मिळणार आहे. चिनी स्मार्टफोन कंपनी वनप्लस 5 जुलै रोजी दोन फोन लाँच करणार आहे. यामध्ये Oneplus Nord 3 आणि Nord CE 3 या फोनचा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अॅमेझॉनवर (Amazone) विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या फोनचे डिटेल्सही समोर आले आहेत.
Oneplus Nord Ce 3 या फोनमध्ये Amoled डिस्प्ले मिळणार आहे. हा डिस्प्ले 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्टेड आहे. गेल्यावर्षी वनप्लसने LED डिस्प्लेसह Nord CE 2 फोन लाँच केला होता. यावर्षी नवीन फोनमध्ये Snapdragon 782G SoC चा सपोर्ट मिळणार आहे. यामुळे ही Nord CE 3 फोनमधील ही मोठी अपडेट आहे. याशिवाय या नवीन फोनमध्ये अनेक भन्नाट फिचर्स पाहायला मिळणार आहेत. अॅमेझॉन या शॉपिंग वेबासाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus Nord CE 3 आणि Nord 3 फोनमध्येही ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. या फोनच्या किंमती व फिचर्सविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...
इतकी असू शकते किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, Oneplus Nord Ce 3 फोनची किंमत 25 ते 28 हजार रूपये इतकी असू शकते. यापूर्वीच अॅमेझॉनवर Nord 3 फोनची किंमत चुकून लीक झाली आहे. या फोनची किंमत 33 हजार रूपये इतकी असू शकते.
Oneplus Nord CE 3 फोनचे स्पेसिफिकेशन्स
Oneplus Nord CE 3 फोनमध्ये 6.7 इंच FHD Plus Amoled डिस्प्ले मिळणार आहे.
Oneplus Nord CE 3 फोनचा डिस्प्ले 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्टेड आहे.
Oneplus Nord CE 3 फोनमध्ये 5000mAh इतक्या क्षमतेची बॅटरी मिळू शकते.
Oneplus Nord CE 3 फोन 80 वॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्टेड आहे.
Oneplus Nord CE 3 फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
Oneplus Nord CE 3 फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टेड आहे.
Oneplus Nord CE 3 फोनमध्ये 8MP अल्ट्रावाईल्ड कॅमेरा आणि 2MP चा तीसरा कॅमेरा मिळू शकते. या फोनमध्ये फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा मिळू शकतो.
Oneplus फोनच्या आधी लाँच होतील हे 2 स्मार्टफोन
Oneplus फोनच्या आधीच मोटोरोला आणि आयक्यू या कंपन्या आपला नवीन फोन लाँच करणार आहेत. 3 जुलै रोजी मोटोरोला Razr 40 सिरीज आणि आयक्यू Neo 7 Pro 5G हे फोन लाँच करण्यात येतील. परंतु या दोन्ही फोन्सच्या किंमती लाँच होण्यापूर्वीच लीक झाल्या आहेत. मोटोरोलाची नवीन फोन सिरीज 59,999 रूपयांपासून विकत मिळू शकतो. तर IQOO Neo 7 Pro 5G फोन 33,999 रूपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :