Twitter vs Threads : भारीच! 'हे' आहेत थ्रेड्सचे 6 भन्नाट फीचर्स; ज्यांचा ट्विटरमध्येही समावेश नाही
Twitter vs Threads : ट्विटरच्या तुलनेत थ्रेड्समध्ये जास्त फीचर्स नाहीत, परंतु या अॅपमध्ये अशी काही फिचर्स आहेत जी ट्विटरवर उपलब्ध नाहीत.
Twitter vs Threads : Meta च्या मालकीचं असलेलं थ्रेड्स अॅप (Threads App) 6 जुलैला लाँच झालं. अॅपने काही दिवसांतच 100 मिलियन युजरबेस ओलांडला आहे. त्यामुळे ट्विटरला कठीण स्पर्धा आहे. Threads हे अॅप सध्या नवीन आहे, त्यामुळे यामध्ये ट्विटरइतके फिचर्स नाहीत. पण, या अॅपमध्ये असे काही फीचर्स आहेत जे ट्विटर आपल्या यूजर्सना वर्षानुवर्ष देऊ शकले नाही. थ्रेड्समध्ये सध्या हॅशटॅग, ट्रेंडिंग सर्च, डीएम इत्यादी ट्विटरच्या महत्त्वाच्या फीचर्सचा पर्याय उपलब्ध नाही. मात्र, मेटाने सांगितल्यानुसार, कंपनी लवकरच अॅपमध्ये अपडेट आणणार आहे आणि यूजर्सना लवकरच नवीन फीचर्स पाहायला मिळतील.
थ्रेड्सची 'हे' 6 भन्नाट फीचर्स
- ट्विटरवर तुम्ही सध्या फक्त 4 फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करू शकता तर थ्रेडमध्ये तुम्ही Instagram सारखे 10 फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करू शकता.
- ट्विटरवर तुम्हाला ब्लॉक आणि अनफॉलोचा पर्याय उपलब्ध आहे. थ्रेड्समध्ये, या दोन पर्यायां व्यतिरिक्त, कंपनी 'Restrict' हा ऑप्शन देते. ज्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला न कळवता त्यांच्यापासून दूर राहू शकता. तुम्हाला त्या व्यक्तीशी संबंधित कोणतेही अपडेट मिळणार नाहीत.
- थ्रेड्समध्ये 'Take a Beak' चा ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही अॅपपासून किती वेळ दूर राहायचं आहे ही वेळ निश्चित करू शकता. मात्र, ट्विटरच्या बाबतीत असा कोणताही पर्याय अजून उपलब्ध नाही.
- थ्रेड्समध्ये, कंपनी काही काळ नोटिफिकेशन्स थांबविण्याचा पर्याय देते. तुम्ही जास्तीत जास्त 8 तास नोटिफिकेशन्स थांबवू शकता. ट्विटरमध्ये असे कोणतेही वैशिष्ट्य उपलब्ध नाही.
- थ्रेड्स इन्स्टाग्रामशी जोडलेले आहे, त्यामुळे तुम्ही एका क्लिकवर थ्रेड्स आणि इंस्टाग्राम स्टोरीमधील पोस्ट शेअर करू शकता. ट्विटरच्या बाबतीत हा पर्याय नाही.
- थ्रेड्सवर लॉगिन करणे सोपे आहे. अगदी पहिल्यांदा देखील Log In तुम्ही सहजरित्या करू शकता. हे अॅप इन्स्टाग्रामशी जोडलेले असल्यामुळे अॅपवर माहिती इंस्टाग्रामवरून मिळते. त्या तुलनेने Twitter चं Log In कठीण आहे कारण हे एक वैयक्तिक अॅप आहे.
थ्रेड्समध्ये लवकरच नवीन फीचर्स येतील
काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी यांनी एका थ्रेड पोस्टमध्ये आश्वासन दिले होते की, अॅपमध्ये सध्या नसलेली अनेक वैशिष्ट्ये लवकरच जोडली जातील. यामध्ये तुम्ही फॉलो करत असलेल्या लोकांच्या पोस्ट दाखवणारी टाईमलाइन, पोस्ट सेव्ह करण्यासाठी बटण आणि पोस्ट शोधण्याची क्षमता समाविष्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Amazon Prime Day Sale : फक्त स्मार्टफोनच नाही तर या लॅपटॉपवरही मिळत आहेत भरघोस सूट