Twitter कडून TweetDeck चं नवं वर्जन लॉन्च; पण वापर करण्यासाठी ब्लू टिक अनिवार्य
Twitter Launch TweetDeck New Version : ट्विटरनं ट्वीटडेकचं नवं व्हर्जन लॉन्च केलं आहे. जर युजर्सना ट्वीटडेक वापरायचं असेल तर त्यासाठी ट्विटर ब्लू मेंबरशिप घ्यावी लागेल.
Twitter Announces New Version of TweetDeck: एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासूनच ट्विटरमध्ये (Twitter) अनेक नवनवीन बदल करण्यात आले आहेत. आता ट्विटरनं युजर्सच्या ट्वीट पाहण्यावरही निर्बंध लादले आहेत. अशातच ट्विटरनं ऑफिशियली सर्वांसाठी TweetDeck चं नवं वर्जन लॉन्च केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ट्वीटडेक वापरताना युजर्सना काही समस्यांचा सामना करावा लागत होता. या समस्या कमी करण्यासाठी ट्वीटडेकचं हे नवं वर्जन मदत करणार आहे. दरम्यान, ट्वीटडेक 30 दिवसांत एक व्हेरिफाइड फिचर होणार आहे. म्हणजेच, जर युजर्सना ट्वीटडेक वापरायचं असेल तर त्यासाठी ट्विटर ब्लू मेंबरशिप घ्यावीच लागेल.
यापूर्वी ट्वीटडेकचा वापर युजर्सना फ्रीमध्ये करता येत होता. तसेच, कंटेंट मॉनिटर करण्यासाठी बिझनेस आणि न्यूज ऑर्गनायझेशनद्वारे वापर केला जातो. त्यामुळे कंपनीनं याच्या वापरासाठी ट्विटर ब्लू मेंबरशिप घेणं अनिर्वाय केलं आहे. कंपनीनं उचललेल्या या पावलामुळे ट्विटच्या रेवेन्यूमध्ये नक्कीच वाढ होणार आहे.
TweetDeck चं नवं वर्जन
TweetDeck आता फुल कंपोजर फंक्शनॅलिटीला सपोर्ट करणार आहे. ज्यामध्ये युजर्सना व्हिडीओ डॉकिंग, पोल्स आणि इतरही अनेक फिचर्सचा वापर करणं शक्य होणार आहे. सध्या TweetDeck चं फंक्शन टेंपरेरी अनअवेलेबल आहे, हे लवकरच म्हणजेच, 30 दिवसांच्या आतच रिस्टोर केलं जाईल. परंतु, याच्या वापरासाठी युजर्सकडे व्हेरिफाईड अकाउंट असणं अत्यंत गरजेचं असणार आहे.
We have just launched a new, improved version of TweetDeck. All users can continue to access their saved searches & workflows via https://t.co/2WwL3hNVR2 by selecting “Try the new TweetDeck” in the bottom left menu.
— Twitter Support (@TwitterSupport) July 3, 2023
Some notes on getting started and the future of the product…
Twitter वर दिवसाला वाचता येणार फक्त 600 पोस्ट
आता ट्विटरवर दिवसाला पोस्ट वाचण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ट्विटरवर पोस्ट वाचण्यावर सध्या तात्पुरत्या मर्यादा घालण्यात आल्या आहे. डेटा स्क्रॅपिंगमुळे हा कठोर निर्णय घेतला असल्याचे एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे. एलॉन मस्क म्हणाले, डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ट्विटर व्हेरीफाईड अकाऊंट (ब्लू टिक असणारे यूजर) यांना दिवसाला सहा हजार पोस्ट वाचता येणार आहे. तर अनव्हेरिफाईड अकाऊंट (ब्लू टिक नसणारे यूजर) यांना दिवसाला 600 पोस्ट वाचता येणार आहे. तर नव्यानं ज्यांनी अकाऊंट उघडले आहेत, अशा अनव्हेरिफाईड अकाऊंटसला दिवसाला 300 पोस्ट वाचता येणार आहे. तसेच एलॉन मस्क यांनी ही लवकरच या मर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितलं आहे.
डेटा स्क्रॅपिंगमुळे मस्क यांनी हा दुसरा निर्णय घेतला आहे. आता ट्विटर पाहण्यासाठी तुम्हाला लॉग-इन करणे बंधनकारक आहे. ट्विटर अकाउंट नसेल तर तुम्हाला ट्विटर ब्राऊज करता येणार नाही. ट्विटरवरून डेटाची चोरी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांनी हा निर्णय घेतला. एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून सातत्यानं नवनवीन बदल ते करत आहेत. त्यांनी अनेकदा सांगितलंय की, ट्विटरला तोट्यातून बाहरे काढण्याच्या दृष्टीनं ते प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लॉन्च केले आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे.
अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी मोजावे लागणार पैसे
युजर्सना आता अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी दर महिन्याला 8 डॉलर्स (अंदाजे 655 रुपये) द्यावे लागणार आहेत. तर कंपन्या किंवा संस्थांना दरमहा 1 हजार डॉलर्स (अंदाजे 81,897 रुपये) शुल्क द्यावे लागेल.